nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :18-Jan-2013
सिडकोत आणखी दोन मालमत्तांना सील  


नांदेड, दि. 18: महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे सिडको क्षेत्रिय कार्यालयांतर्गत आणखी दोन मालमत्तांना शुक्रवारी (दि.18) सील ठोकण्यात आले. सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांच्या नेतृत्वाखालील वसुली पथकाने ही कारवाई केली. पाच दिवसात संबधितांनी त्यांच्याकडील कराच्या रक्कमेचा भरणा केला नाही, तर त्यांची मालमत्ता जप्त करुन त्यांना दिलेल्या महापालिकेच्या सुविधा बंद करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.

रतनसिंघ ठाकूर यांच्या 10-2-987 क्रमांकाच्या मालमत्तेपोटी 14 हजार 410 रुपये तर महम्मद असगर यांच्याकडे 11-6-714 क्रमांकाच्या मालमत्तेपोटी 16 हजार 781 रुपयांची कर येणेबाकी होती. शुक्रवारी त्यांच्याकडे करवसुली व जप्ती पथक गेल्यानंतरही त्यांनी कराचा भरणा करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेला सील ठोकण्यात आले. इतर मालमत्ताधारकांनीही आपल्याकडील मालमत्ता कर भरुन जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.