![]() | ||
| ||
समाचार |
|
Dated :17-Jan-2013 |
|
एलबीटीचे सव्वा कोटी थकवणार्या ‘आयडीया’चे दोन टॉवर सील | |
नांदेड, दि. 17: गेल्या दोन वर्षात मनपा क्षेत्रात कोट्यवधी रुपयांच्या रिचार्ज कूपनची आयात करुन सुमारे एक कोटी 30 लाख रुपयांचा एलबीटी कर थकवणार्या ‘आयडीया’ मोबाईल सेवेच्या कलामंदीरसमोरील बरारा टॉवर आणि हनुमान टेकडी येथील मुख्य टॉवरला महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाच्या विशेष वसुली पथकाने आज गुरुवारी (दि.17) सील ठोकले. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी ‘आयडीया’ची मोबाईल सेवा बंद पडली असून काही ठिकाणी सेवा विस्कळीत झाली आहे. मोबाईल सेवेच्या रिचार्ज कूपनच्या आयात मालावर 4 टक्के स्थानिक संस्था कर आकारला जातो. ‘आयडीया’ कंपनीने नांदेड मनपा क्षेत्रात 2010 साली स्थानिक संस्था कर लागू झाल्यापासून मनपा क्षेत्रात कोट्यवधी रुपयांच्या रिचार्ज कूपनची विक्री करुन स्थानिक ग्राहकांना सेवा पुरवली आहे. परंतु आतापर्यंत एकही रुपयांचा स्थानिक कर भरलेला नाही. याबाबत संबधित कंपनीच्या प्रतिनिधींना वारंवार कळविल्यानंतरही त्यांनी कर भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त वसुधा फड, क्षेत्रीय अधिकारी अविनाश आटकोरे, गुरुबक्षसिंघ, सायन्ना, नागेश एकाळे, राजेश कर्हाळे, व्यंकट कल्याणकर यांच्या पथकाने बरारा टॉवर आणि हनुमान टेकडी येथील ‘आयडीया’ मोबाईल सेवेच्या टॉवरला सील केले.
====================================================================
====================================================================
==================================================================== |
|