nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :16-Jan-2013
विषय समिती पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर 

आज आणि उद्या अर्ज स्विकारणार

नांदेड,दि. 16: स्थायी समितीच्या सभापती तसेच पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापतींची निवड येत्या 21 जानेवारी 2013 रोजी त्या-त्या समितीतील विशेष सभेत केली जाणार असून निवड प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तिन्ही पदाकरिता महापालिकेच्या नगरसचिव विभागात दि. 17 व 18 जानेवारी 2013 अशा दोन दिवशी सकाळी 11 ते 4 या वेळेत नामनिर्देशनपत्र उपलब्ध राहणार असून या दोन्ही दिवशी दुपारी 3 ते 5 या वेळेतच अर्ज स्विकारले जाणार आहेत.

पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली दि. 21 रोजी सकाळी 10 वाजता होणार्‍या विशेष सभेत आधी स्थायी व नंतर महिला समितीच्या पदाधिकार्‍यांची निवड केली जाणार आहे. स्थायी समितीत 16 तर महिला व बालकल्याण समितीत 11 सदस्यांचा समावेश आहे. विशेष सभेतच नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन त्यानंतर नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी 15 मिनीटांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर आवश्यकता भासल्यास मतदान घेण्यात येऊन निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

उमेदवारास नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी समिती सदस्य असलेला एक सूचक आणि एक अनुमोदक आवश्यक असणार आहे. एका सूचक किंवा अनुमोदकाला एकाचेच नाव सुचवता येईल. तसेच सूचक किंवा अनुमोदकाला उमेदवार म्हणून त्या पदासाठी निवडणूक लढवता येणार नाही. एकापेक्षा अधिक नामनिर्देशनपत्रावर सूचकाने स्वाक्षरी केल्यास नगरसचिव यांच्याकडे प्रथम प्राप्त झालेले नामनिर्देशन पत्र वगळता इतर नामनिर्देशनपत्रे अवैध ठरवण्यात येतील.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.