![]() | ||
| ||
समाचार |
|
Dated :16-Jan-2013 |
|
रविवारच्या पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी शहरात 265 केंद्रे | |
लसीकरणापासून एकही बालक वंचित ठेवू नका- महापालिकेचे आवाहन नांदेड, दि. 16: येत्या 20 जानेवारी आणि 24 फेब्रुवारी 2013 अशा दोन टप्प्यात महापालिका क्षेत्रात राबवण्यात येणा-या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी महापालिका क्षेत्रात 265 लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. सदर केंद्रांची यादी महापालिकेच्या www.nwcmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून 0 ते 5 वयोगटातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त जी. श्रीकांत आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव मोरे यांनी केले आहे. समूळ पोलिओ निर्मूलनासाठी नांदेड महापालिका क्षेत्रातील विविध अंगणवाड्या, महापालिका, शासकीय आणि खाजगी रुग्णालये, शाळा, महाविद्यालय, धार्मिक किंवा सार्वजनिक स्थळे अशा एकूण 265 ठिकाणी पल्स पोलिओ लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रात मागच्या वेळी झालेल्या या मोहिमेत सुमारे 86 हजार बालकांचे पोलिओ लसीकरण करण्यात आले होते. यावर्षी 89 हजार बालकांच्या लसीकरणाचे उद्दीष्ट आहे. मनपा क्षेत्रातील लसीकरण केंद्रांच्या नावांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर http://nwcmc.gov.in/newsdetail.php?fid=173 या ठिकाणी उपलब्ध आहे. नागरिकांनी जवळच्या किंवा सोयीच्या केंद्रावर जावून आपल्याकडील बालकांचे पोलिओ लसीकरण करुन घ्यावे. शहरातील सर्व यंत्रणा आणि पालकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, एकही पात्र बालक लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
====================================================================
==================================================================== |
|