nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
प्रगटन – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड च्या सर्व सेवानिवृत्त /कुटुंब निवृत्त वेतनधारक यांनी हयात रजिष्टरवर सही केलेले नाही अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी दि. 31.05.2022 पर्यंत मनपा मुख्य ईमारततील लेखा विभाग खोली क्रं. 311 मध्ये येवून हयात रजिष्टरवर सही करणेसाठी अवगत करावे. || मनपा नांदेड, साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदला बाबत ||  
समाचार

Dated :16-Jan-2013
जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडून विष्णुपुरी जलाशयाची बोटीद्वारे संयुक्त पाहणी नांदेड, दि. 16: विष्णुपुरी जलाशयातील पाणी पिण्यासाठी राखीव असल्याने त्याचा सिंचनासाठी बेकायदेशीर वापर करण्यावर जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे. त्याच्या अंमलबजावणी मोहिमेतंर्गत जिल्हाधिकारी धीरज कुमार आणि मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (दि.15) शंकर सागर जलाशयात बोटीद्वारे प्रत्यक्ष फिरुन पाहणी केली. जलाशयातून शेतीसाठी नियमबाह्यरित्या पाणी वापरणार्‍या शेतक-यांनी आपल्या मोटारी काढून घेतल्या नाहीत, तर त्यांचे साहित्य जप्त करावेत, अशा सूचना दक्षता पथकाला दिल्या.

विष्णुपुरी जलाशयात सध्या पिण्यासाठी पुरेल इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. कालवा पाणी वाटप समितीने दि. 1 जानेवारी 2013 पासून जलाशयातील पाण्याचा वापर सिंचनासाठी करण्यावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे जलाशयातील पाण्याचा गैरवापर आणि चोरी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महसूल, पोलिस, महापालिका, महावितरण, जलसंपदा अशा पाच विभागाचे संयुक्त पथक स्थापन केले असून दोन बोटींद्वारे जलाशयाच्या पाण्यासाठी गस्त घातली जात आहे.

जलाशयात उपलब्ध पाणी आणि त्याचा शेतीसाठी केला जाणारा अनाधिकृत वापर याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि आयुक्त हे मंगळवारी (दि.15) दुपारी स्वत: जलाशयाच्या बोटीत उतरले. त्यांच्यासोबत दक्षता पथकातील इतर सदस्यही उपस्थित होते. जलाशयाच्या काठावरील कृषीपंपाचा विद्युत पुरवठा तोडल्यानंतर अनेक शेतकर्‍यांनी अद्याप विद्युत मोटारी काढून घेतल्या नसल्याचे तसेच जनरेटरद्वारे जलाशयाचे पाणी शेतीला देण्यात येत असल्याचे चित्र जिल्हाधिकार्‍यांना दिसले. सदर सर्व शेतकर्‍यांना सूचना दिल्यानंतरही मोटारी काढून घेतल्या नाहीत तर त्यांनी पाणी खेचू नये, याकरिता जी- जी आवश्यक वाटेल ती कारवाई पथकाने करावी, अशी सूचना जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी केली.

अचानक भेटी देऊन माहिती घेणार
जलाशयातून छुप्या मार्गाने पाणी घेणार्‍यांवर निर्बंध आणण्याची केवळ कागदावरची माहिती घेऊन मी समाधान करणार नाही, तर आठवडा किंवा पंधरवाड्य़ात कधीही एक आकस्मिक भेटी देऊन अंमलबजावणीची माहिती प्रत्यक्ष घेणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी या पथकाला सांगितले. जलाशयातील पाणी पिण्यासाठी राखीव असल्याने त्याचा वापर अन्य कारणासाठी कोणीही करु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.