nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :16-Jan-2013
कर भरण्यासाठी टाळाटाळ करणार्‍या तीन मालमत्तांना महापालिकेचे टाळे 



नांदेड, दि.16: महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणार्‍या सिडको क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दोन तर अशोकनगरात एक अशा तीन मालमत्तांना महापालिकेच्या करवसुली पथकाने बुधवारी (दि.15) सील ठोकले आहे. सहाय्यक आयुक्त गुलाम सादेख आणि अविनाश आटकोरे यांनी ही कारवाई केली. संबधित मालमत्ताधारकांनी पाच दिवसात कराची रक्कम भरली नाही, तर जप्तीची कारवाई करुन पाणीपुरवठा, ड्रेनेजलाईन कनेक्शन बंद केले जाईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून कर थकवणार्‍या मालमत्ताधारकांना शोधून त्यांच्या मालमत्तेची जप्ती करण्याचे धोरण महापालिकेने स्विकारले आहे. त्याअंतर्गत बुधवारी अशोकनगर क्षेत्रीय कार्यालय क्र. 2 अंतर्गत औद्योगिक वसाहत रामविलास ओझा यांच्या मालमत्ता क्र. 1-5-24 (विष्णु दाल मिल) या मालमत्तेपोटी 86 हजार 739 रुपयांचा कर थकित होता. त्याचबरोबर सिडको क्षेत्रीय कार्यालयांतर्गत साहेबराव परसराम गजभारे यांच्या मालमत्ता क्रं. 11-1-262 आणि विठ्ठल गजभारे यांच्या मालमत्ता क्र. 11-1-263 च्या करापोटी अनुक्रमे 16 हजार 56 रुपये आणि 11 हजार 447 थकबाकी शिल्लक होती. या तिन्ही मालमत्ताधारकांकडे महापालिकेचे वसुली पथक पोहचल्यानंतर त्यांना कर भरण्याची अंतिम संधी देण्यात आली. परंतु त्यांनी कर भरला नाही. त्याकरिता तिन्ही मालमतांना सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.