nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :15-Jan-2013
विष्णुपुरीच्या जलसाठ्यावर प्रशासनाची करडी नजर  

संयुक्त पथकाच्या बोटीतून शेतक-यांना मोटारी काढून घेण्याची पूर्वसूचना

नांदेड, दि. 15: विष्णुपुरी येथील शंकरसागर जलाशयात पिण्यासाठी पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक असल्याने महापालिका, महसूल प्रशासन, महावितरण, पोलिस आणि पाटबंधारे विभागाच्या संयुक्त पथकाकडून दोन बोटींच्या सहाय्याने जलाशयाच्या पात्रात पावसाळा सुरु होईपर्यंत दररोज गस्त घातली जाणार आहे. या मोहिमेचा पहिला भाग म्हणून पथकांनी जलाशयाच्या काठावर असलेल्या शेतक-यांशी संपर्क करुन शेतीसाठी वापरण्यात येणा-या विद्युत मोटारी काढून घेण्याची सूचना केली आहे. येत्या 24 तासात शेतक-यांनी मोटारी स्वत:हून काढल्या नाहीत तर मोटारी व त्याकरिता वापरण्यात येणारे जनरेटर जप्त करुन कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली असताना केवळ विष्णुपुरी शंकर सागर जलाशयात असलेल्या जेमतेम जलसाठ्यामुळे नांदेडकर सुदैवी आहेत. जलाशयात सध्या पिण्यासाठी पुरेल, इतकाच जलसाठा उपलब्ध असून पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने केला तरच पावसाळा सुरु होईपर्यंत हे पाणी पिण्यासाठी पुरु शकते. त्याकरिता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत आणि आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.

विष्णुपुरी शंकर सागर जलाशयातून शेतक-यांसाठी पाण्याचा उपसा दि. 1 जानेवारीपासून पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय पाणी वाटप समितीने घेतला असून त्यानुसार महावितरण कंपनीने नदीकाठावरील कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. पंरतु काही शेतकरी जनरेटर अथवा वीजपुरठ्याची पर्यायी साधनांचा वापर करुन विद्युत मोटारीद्वारे शेतीला पाणीपुरवठा करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी जलाशयाच्या पाण्यावर गस्त घालण्यासाठी दक्षता पथक स्थापन केले आहे.

या पथकात नायब तहसीलदार आर. जी. गळगे, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवाजी डहाळे, जलसंपदा विभागाचे उपअभियंता यशवंत निखाते, महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता प्रमोद क्षिरसागर, पोलिस उपनिरिक्षक संदीप दुनगहू, पोलिस उपनिरिक्षक गुडे, जमादार बाबूराव आडबलवार, पोलिस नायक संजय पवळे-पाटील, प्रभाकर हिंगमिरे, गिरमाजी हंबर्डे, भानुदास बोकारे यांचा समावेश आहे. पथकाने जलाशयाच्या काठावरील थुगाव, राहाटी, जैतापूर, पिंपळगाव (कोरका), सोमेश्वर, भनगी, वाहेगाव, मार्कंडेय, पोळपिंपळगाव, मोहनपुरा, विष्णुपुरी, बेटसांगवी आदी गावांच्या शेतक-यांशी नदीकाठावर जाऊन चर्चा केली त्याचबरोबर पाणी खेचण्यासाठी जलाशयात लावलेल्या मोटारी काढून घेण्याची सूचना केली. शेतक-यांनी या सूचनेचा स्विकार करुन विद्युत मोटारी तात्काळ काढून घेण्याचे मान्य करीत जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे. शेतक-यांनी मोटारी काढल्या नाहीत, तर त्यांच्या मोटारी व जनरेटर जप्त करुन त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याचा इशारा पथकाने दिला आहे.

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.