nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :14-Jan-2013
स्थायी आणि महिला व बालकल्याण समिती सभापतींची 21 रोजी निवड नांदेड, दि.14: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती तसेच पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण महिला व बालकल्याण समिती सभापतींची निवड करण्यासाठी येत्या दि. 21 जानेवारी 2013 रोजी संबधित समित्यांच्या नामनिर्देशित सदस्यांची विशेष सभा घेण्याची सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापालिकेला केली असून पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी धीरज कुमार यांची नियुक्ती केली आहे.

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत या दोन्ही समित्यांच्या सदस्यांची कोट्याप्रमाणे निश्चित केलेल्या सदस्यसंख्येनुसार संबधित पक्षाच्या गटनेत्यांनी निवड करण्याची शिफारस महापौर अब्दुल सत्तार यांच्याकडे केली होती. त्यानुसार स्थायी समितीत कॉंग्रेसचे 8, शिवसेना-भाजप आघाडी आणि एमआयएम-संविधान पार्टी आघाडीचे प्रत्येकी 3 तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 2 अशा 16 सदस्यांची निवड करण्यात आली होती. तर पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी कॉंग्रेसच्या सहा, शिवसेना-भाजप आघाडी आणि एमआयएम-संविधान पार्टी आघाडीचे प्रत्येकी 2 तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका अशा 11 सदस्याची निवड करण्यात आली होती.

या दोन्ही विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार हे स्वतंत्रपणे जाहीर करणार आहेत. सर्वप्रथम स्थायी समिती आणि त्यानंतर पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवड केली जाणार आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.