nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
प्रगटन – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड च्या सर्व सेवानिवृत्त /कुटुंब निवृत्त वेतनधारक यांनी हयात रजिष्टरवर सही केलेले नाही अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी दि. 31.05.2022 पर्यंत मनपा मुख्य ईमारततील लेखा विभाग खोली क्रं. 311 मध्ये येवून हयात रजिष्टरवर सही करणेसाठी अवगत करावे. || मनपा नांदेड, साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदला बाबत ||  
समाचार

Dated :14-Jan-2013
महापालिकेत पत्रकारांच्या कुटुंबियातील 145 सदस्यांची आधार नोंदणी 



नांदेड, दि.14: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रसारमाध्यम कर्मचारी व पत्रकारांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी रविवारी (दि.13) झालेल्या उपक्रमातंर्गत 145 रहिवाश्यांची आधार ओळखपत्र नोंदणी करण्यात आली. पत्रकारांना टोकनबरोबरच वेळदेखील निश्चित करुन दिल्यामुळे रांग किंवा गर्दीचे चित्र टाळता आले.

दर्पण दिनानिमित्त दि. 6 जानेवारी 2013 रोजी याआधी हा खास उपक्रम घेण्यात आला होता. परंतु त्या दिवशी असलेल्या विविध कार्यक्रमामुळे तसेच कीटच्या मर्यादित संख्येमुळे काही पत्रकारांच्या कुटुंबियांना नोंदणीअभावी परत जावे लागले होते. आयुक्त जी. श्रीकांत, अप्पर आयुक्त तथा आधारचे नोडल ऑफिसर रा. ल. गगराणी यांनी आधार नोंदणीच्या विशेष मोहिमेची माहिती घेतली. जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा यांच्या नियोजनानुसार अलंकित संस्थेचे प्रतिनिधी अमोल फुके, महापालिकेच्या आधार विभागाचे सतीश महाबळे, संगणकचालक विष्णू ठोके, अंजली देवकांबळे, हर्षद खान, मधूसुदन पांचाळ, महम्मद वाजिद, काजी जमीर अहेमद, सैफ अली, मनपा पोलिस पथकप्रमुख दत्तात्रय सिद्धेवाड, पोलिस कर्मचारी गोविंद वाघमारे, गोविंद लिंगनवाड, जावेदखान पठाण, यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत 145 जणांची आधार नोंदणी पूर्ण करण्यात आली. नोंदणीसाठी दोन दिवस आधीच टोकणसाठी आगाऊ नावे नोंदवण्यात आल्यामुळे येणार्‍या प्रत्येकास वेवेवेगळ्या वेळांची निश्चिती करुन देण्यात आली. त्यामुळे कोणालाही रांगेत उभे राहण्याची गरज भासली नाही. टोकण दिलेल्या प्रत्येकाची आधार नोंदणी करण्यात आली.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.