nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
जाहिर लिलाव सूचना : - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीतील तयबाजारी, आठवडी बाजार, दैनिक जमिन भाडे (नो हॉकर्स झोन वगळून) भाडे वसुलीचा मक्ता ताबा देणे बाबत. || नांवाशमनपा जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :12-Jan-2013
महापालिका देणार महिला, युवतींना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण  


• राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त उपमहापौरांची घोषणा
• 18 जानेवारीपासून सुरु होणार वर्ग

नांदेड, दि.12: देशात महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या वतीने महिला अणि मुलींना कराटेसारख्या स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्याची घोषणा उपमहापौर आनंद चव्हाण यांनी आज शनिवारी (दि.12) एका कार्यक्रमात केली. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनीही या उपक्रमाची येत्या 18 जानेवारीपासून अंमलबजावणी करण्याचे संकेत यावेळी दिले.

महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत आज राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपायुक्त रत्नाकर वाघमारे, नगरसेवक किशोर भवरे, किशोर यादव, नगरसेविका सौ. गंगासागर आन्नेवार, प्रा.डॉ ललिता बोकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत यांनी याविषयी नुकतीच आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली होती. ही मागणी मान्य केल्याबद्दल रावत यांनी आयुक्तांना धन्यवाद देऊन महापालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे..

महिला, मुलींना नोंदणीचे आवाहन
श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम येथे दि. 18 जानेवारी 2013 ते 14 फेब्रुवारी 2013 यादरम्यान सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात कराटेचे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणासाठी खास महिला प्रशिक्षक कार्यरत राहणार आहेत. शाळा, महाविद्यालयातील 13 वर्षावरील मुली, युवती तसेच शहरातील महिलांनी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी महापालिकेचे स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे (9011000994) यांच्याशी महापालिका प्रशासकीय इमारतीत दुसरा मजला अथवा कराटे प्रशिक्षक विक्रांत खेडकर (9145240117) यांच्याशी खेडकर स्पोर्टस, विसावानगर, नांदेड येथे संपर्क करुन दि. 18 जानेवारी 2013 पर्यंत त्यांच्या कार्यालयात प्रवेश पत्र भरुन द्यावेत. येताना आपले ओळखपत्राची प्रत तसेच एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.