nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :12-Jan-2013
होलसेल दुकानातून हिशेबाचे दोन पोते रजिस्टर जप्त 


एलबीटी विभागाची आशिष गारमेंटवर धाड

नांदेड, दि.12: एलबीटी वसुलीसाठी नेमलेल्या विशेष पथकाने आज शनिवारी (दि.12) एम. जी. रस्त्यावरील आशिष गारमेंटस या तयार कपड्याच्या दुकानावर धाड टाकून तेथून व्यावसायीक हिशेबाचे रजिस्टर, पावत्या, फाईल्स असे दोन पोते साहित्य तपासणीसाठी ताब्यात घेतले.

महापालिकेला उत्पन्न देणार्‍या प्रमुख स्त्रोतापैकी एलबीटी (स्थानिक संस्था कर) हा सर्वात महत्वाचा स्त्रोत आहे. दोन दिवसापूर्वीच मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी एलबीटी विशेष पथकातील काही कर्मचार्‍यांच्या इतर विभागात बदल्या करुन त्यांच्या जागेवर अन्य विभागातून कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर आज शनिवारी या पथकाने एम. जी. रस्त्यावरील आशिष गारमेंट दुकानाची तपासनी करुन तेथे आढळलेले रजिस्टर, पावत्या आणि काही फाईल्स तपासणीसाठी ताब्यात घेतले.

या प्रतिष्ठानाने एप्रील ते डिसेंबर 2012 या नऊ महिण्याच्या कालावधीत एलबीटीपोटी 2 लाख रुपये भरले आहेत. परंतु मालाच्या उलाढाल व्यवहाराबद्दल पथकाला शंका आल्यामुळे आज तपासणीसाठी पथक तेथे गेले होते. पथकाने दुकानाच्या तिन्ही मजल्यावर साठवलेल्या मालाचा आढावा घेऊन त्याची नोंद घेतली.

या मोहिमेत एलबीटीच्या सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांच्या नेतृत्वाखाली विजय कुलकर्णी, नागेश एकाळे, रमेश हैबते, सायन्ना, खरपास, गायकवाड, बैस, चौधरी, गुरुबक्ष महाराज यांचा सहभाग होता. क्षेत्रीय अधिकारी अविनाश आटकोरे, गुलाम सादेख यांनीही पथकाला मदत केली.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.