nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :12-Jan-2013
16 मालमत्ताधारकांनी दिले 78 लाखाचे धनादेश 


दुसर्‍या दिवशी तीन मालमत्ताधारकांवर महापालिकेचा हातोडा

नांदेड, दि. 11: महापालिकेने सुरु केलेली अनाधिकृत बांधकामविरोधी मोहिम शनिवारी, दुसर्‍या दिवशीही (दि.11) सुरुच होती. इतवारा आणि तरोडा झोनमधील 16 मालमत्ताधारकांनी आपले अतिरिक्त बांधकाम नियमित करुन घेण्याची हमी देऊन दंडाच्या रक्कमेपोटी 78 लाख रुपयांचे धनादेश स्वत:हून महापालिकेच्या स्वाधिन केले. यामध्ये इतवारा भागात नियमित होण्याची शक्यता नसलेल्या तीन इमारतीच्या संरक्षक भिंत आणि गॅलरीचा काही भाग तोडण्यात आला. दोन दिवसात या मोहिमेअंतर्गत एक कोटी 12 लाख रुपयांचे धनादेश मनपाकडे जमा झाले आहेत.

महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्या सूचनेनुसार अनाधिकृत बांधकाम विरोधी पथकाच्या सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांच्या नेतृत्वाखाली इतवाराचे सहाय्यक आयुक्त सुधीर इंगोले व तरोडाचे सहाय्यक आयुक्त मोहन डिंकाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. इमारत निरिक्षक जसपालसिंघ तबेलेवाले, बंडोपंत उत्तरवार, गणेश शिंगे, संभाजी कास्टेवाड, जगतकर, जाफर, वाघमारे, दयानंद कवले, शे. फारुख शे. गफूर, दीपक पाईकराव यांचा या पथकात समावेश होता.

इतवारा भागात महंमद हारुण/म. सज्जाद म. कासीम यांनी इस्लामपुर्‍यात पांदन रस्त्यावर तीन मजल्यांची इमारत अनाधिकृतरित्या बांधल्यानंतर काही दिवसापूर्वीच ती नियमित करण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यातील तांत्रीक बाबीची पूर्तता करण्याची हमी मालमत्ताधारकाने देऊन दंड व इतर प्रक्रियेपोटी लागणार्‍या रक्कमेपोटी 10 लाख रुपयांचा अग्रीम धनादेश दिला. मदिनानगरच्या खय्युम कॉम्प्लेक्समध्ये चांदपाशा मिरासाब कुरेशी आणि मदिनानगरच्या अ. मन्नान खाजा यांनीही हाच कित्ता गिरवला. दोघांनीही प्रत्येकी 3 लाख रुपयांचे धनादेश भरुन आपले बांधकाम नियमित करुन घेण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबीची पूर्तता करण्याची हमी दिली. या तिन्ही इमारतीतील नियमित होण्याची शक्यता नसलेला काही भाग मनपाच्या पथकाने पाडल्यानंतर उर्वरीत भाग त्यांनी स्वत:च पाडून घेण्याची हमी घेतली.

तरोड्यात बांधकाम परवानगी घेतल्यानंतर त्यापेक्षा अधिक बांधकाम केलेल्या 12 इमारतींवर महापालिकेचे पथक धडकले. संभाजीनगरच्या सुभाष धोडगे, कुणालनगरातील साई सिध्दी कन्सक्ट्रकन्स, तरोडा खु. मधील सौ. अनिता बियाणी, प्रदिप कामठेकर, सौ. विजया राठी, सौ. अरुणा कल्याणकर, शिवाजी कल्याणकर, इंदूमती देशमुख, संजय बियाणी, नवनाथ कोंडामंगल, गंगा डेव्हलपर्स, गोवर्धन ड्रीमस होममेकर या 12 मालमत्ताधारकांनी नवीन विकास नियंत्रण नियमावलीअंतर्गत शक्य तितके अतिरिक्त बांधकाम नियमित कररुन घेण्याची तसेच जे नियमित होणार नाही, ते बांधकाम विहित मुदतीत पाडून घेण्याची हमी दिली. या सर्वांकडून एकूण 57 लाख रुपयांचे धनादेश महापालिकेला मिळाले आहेत.

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.