nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :11-Jan-2013
पाच अनाधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा 


• महिला अधिकार्‍यासोबत हुज्जत घालणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

• सात मालमत्ताधारकांनी भरले 34 लाख रुपयांचे अनामत धनादेश

नांदेड, दि.11: शहरातील विविध भागांमध्ये अनाधिकृत बांधकाम केलेल्या पाच इमारतीवर महापालिकेने आज शुक्रवारी (दि.11) हातोडा चालवला. या पाचमधील तीन तसेच अन्य चार अशा सात मालमत्ताधारकांनी आपले नियमबाह्य बांधकाम स्वत:हून पाडण्याची हमी देऊन महापालिकेकडे दंडनीय प्रक्रियेसाठी 34 लाख 25 रुपयांचे अनामत धनादेश जमा केले आहेत. हनुमानगढ कमानीसमोर रस्त्याच्या बाजूने मंजूर नकाशाविरुध्द उभारलेले व्यावसायिक संकुल पाडण्याचे काम सुरु असताना तेथील ठेकेदार व एका मुलीने महापालिकेच्या महिला अधिकार्‍याशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण व अनाधिकृत बांधकाम विभागाच्या सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांच्या नेतृत्वाखालील क्षेत्रीय अधिकारी, इमारत निरिक्षक, अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचार्‍यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत हनुमानगढ कमानीसमोर संजीव साईबाबा दुभास यांनी मंजूर नकाशाविरुध्द रस्त्याच्या बाजूने काढलेले व्यावसायीक संकुल जमिनदोस्त करण्यात आले. या ठिकाणी तेथील ठेकेदार व एका मुलीने सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिस उपअधिक्षक यशवंत सोळंके, संजय पिसे, विमानतळ ठाण्याचे पोलिस निरिक्षक धरमसिंग चव्हाण, भाग्यनगरचे शेळके हे फौजफाट्यासह दाखल झाले. हर्षनगर भागात महापालिकेच्या खुल्या भूखंडावर अतिक्रमण व अनाधिकृत बांधकाम केलेल्या चिखलीकर व कोलते यांचे बांधकाम काढून टाकण्यात आले. सहाय्यक आयुक्त अविनाश आटकोरे, गणेश शिंगे, उपअभियंता टाकळीकर, तेहरा, दंडेवाड यांच्या पथकाने या मोहिमेत सहभाग घेतला.

वजिराबाद भागातील बोरबन परिसरातील सिध्दीविनायक कन्स्ट्र्क्शन्स यांच्या इमारतीत वाहनतळासाठी असलेल्या जागेत केलेले बांधकाम काही प्रमाणात पाडण्यात आले. त्यानंतर त्यांनी दंडनीय कारवाईसाठी 10 लाख रुपयांचा धनादेश देऊन दिलेल्या मुदतीत सदर बांधकाम पाडून घेण्याची हमी दिली. याच भागातील अजय बुरांडे यांच्या इमारतीच्या पायर्‍या पाडण्यात आल्या तसेच त्यांनी दंडनीय रक्कम 5 लाख रुपयांचा अनामत धनादेश महापालिकेला दिला. त्याचबरोबर डॉ. संग्राम जोंधळे यांनी औषधी दुकानासह तीन अनाधिकृत मजले विहित मुदतीत पाडून घेण्याची हमी देऊन पाच लाख रुपयांचा अनामत धनादेश दंडनीय अनामतपोटी जमा केले तर नरेश परमानी यांनी मंजूर नकाशापेक्षा अधिक बांधकाम केल्यामुळे एक लाख रुपयांचा अनामत धनादेश देऊन आपले बांधकाम नियमित करुन घेण्याची हमी दिली. सहाय्यक आयुक्त एस. टी. मोरे, उपअभियंता खुशाल कदम, बोधनकर, स. रचपालसिंघ साहू, खरपास यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

सिडको क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भगवान बारसे यांनी अनियमित बांधकाम केल्याबद्दल त्यांच्या इमारतीच्या दोन मजल्यावरील गॅलरी पाडल्यानंतर त्यांनी आपले बांधकाम नियमीत करुन घेण्याची हमी देऊन 25 हजार रुपयांचा अनामत धनादेश जमा केला. तर आकृती बिल्डर्स यांनी मंजूर नकाशाविरुध्दचे बांधकाम काढून टाकण्याची हमी देऊन दंडनीय अनामत म्हणून 10 लाख रुपयांचा तर नंदूसेठ परमाणी यांनीही 3 लाख रुपयांचा अनामत धनादेश जमा केला. सहाय्यक आयुक्त गुलाम सादेख, रणजीत जोंधळे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. शिवाजीनगर भागात अश्विनी हॉस्पिटलच्या इमारतीत केलेल्या अतिरिक्त बांधकामाबाबत चौकशी करण्यासाठी आयुक्त जी. श्रीकांत हे स्वत: तेथे गेले होते. त्यावेळी त्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या वाहनतळासाठी असलेला तळमजला तात्काळ खुला करुन सुधारित प्रस्ताव तातडीने दाखल करण्याची सूचना केली.

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.