nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :09-Jan-2013
इतवा-यात दोन मालमत्तांना सील 


नांदेड, दि. 9: महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्यांच्या मालमत्तेला सील ठोक़ण्याची कारवाई आता इतवारा क्षेत्रीय कार्यालयांतर्गतदेखील सुरु झाली असून सहाय्यक आयुक्त सुधीर इंगोले यांच्या नेतृत्वाखालील वसुली पथकाने आज बुधवारी (दि.9) सराफा कॉर्नर भागातील दोन मालमत्तेला सील ठोकले. पाच दिवसात संबधितांनी त्यांच्याकडील कराच्या रक्कमेचा भरणा केला नाही, तर त्यांची मालमत्ता जप्त करुन त्यांना दिलेल्या महापालिकेच्या सुविधा बंद करण्यात येतील, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

सराफा कॉर्नर भागातील अजिमोद्दीन खमरोद्दीन/भोजालाल गवळी यांच्या 5-3-363 क्रमांकाच्या मालमत्तीपोटी 47 हजार 140 रुपये तर अब्दुल हादी अब्दुल बारी यांच्याकडे 5-3-366 क्रमांकाच्या मालमत्तेपोटी 7 हजार 331 रुपयांची कराचे येणेबाकी होती. बुधवारी त्यांच्याकडे करवसुली व जप्ती पथक गेल्यानंतरही त्यांनी कराचा भरणा करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेला सील ठोकण्यात आले. इतर मालमत्ताधारकांनीही आपल्याकडील मालमत्ता कर भरुन जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.