nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :09-Jan-2013
आमदार-खासदार निधीतील कामे प्राधान्याने पूर्ण करा 

आ. ओमप्रकाश पोकर्णा यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक

नांदेड, दि. 9: आमदार आणि खासदार यांच्या स्थानिक विकास निधीमधून घेतलेली रस्त्यांची कामे तातडीने आणि प्राधान्याने पूर्ण करावीत, अशी सूचना मनपा आयुक्त जी. श्रीकांत व नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी आज बुधवारी महापालिकेत झालेल्या बैठकीदरम्यान संबधित यंत्रणेला केली.

नांदेड दक्षिण मतदारसंघातील महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या समस्या व उपाययोजनेसंदर्भात आयुक्तांच्या कक्षात महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकार्‍यांची आज बैठक झाली. बैठकीस आमदार पोकर्णा, आयुक्त जी. श्रीकांत, अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, नगरसेवक सतीश राखेवार, फारुख अली, विनय गिरडे पाटील, नवल पोकर्णा यांची प्रमुख उपस्थिती होती. पोकर्णा यांच्या आमदार निधीतून मनपा क्षेत्रात असलेल्या 20 पैकी 11 कामे पूर्ण झाली असून यातील दोन कामाचे देयक देणे प्रलंबित आहे. उर्वरीत पैकी आठ कामे प्रगतीपथावर असून तर एका कामाच्या तिसर्‍यांदा निविदा मागवण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

भुसार गल्ली येथील काम होण्यापूर्वी तेथे ड्रेनेज लाईन टाकणे आवश्यक असल्यामुळे तेथील काम रखडले असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. त्यावर आ. पोकर्णा यांनी तात्काळ ड्रेनेज लाईन टाकून या रस्त्याचे काम करण्याची सूचना केली. जुना पुल ते नवीन पुल (रविनगर कौठा ते गोवर्धनघाट पुल) रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे, सिडकोतील आंबेडकर चौक ते वसंतराव नाईक महाविद्यालय, मॉलसमोरच्या खराणे पाटील चौक ते नागार्जुना शाळा या दोन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आ. पोकर्णा यांनी आयुक्तांकडे केली.

सिडको स्मशानभूमीसाठी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून सदर काम सुरु करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. नो पार्किंगमधून वाहने उचलणार्‍या ठेकेदाराकडून नागरिक व महिलांना त्रास देण्यात येत असल्याच्या तक्रारी असून नवीन ठेकेदाराकडे हे काम सोपवावे, असा आग्रहदेखील आ. पोकर्णा यांनी यावेळी केला.


सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी शक्तीनगर जलकुंभावरुन पाणीपुरवठा सुरु झाल्याने यात्री निवासच्या जलकुंभावरुन त्या परिसरात पूर्वीपासून होणारा पाणीपुरवठा आता बंद करुन गुरुद्वारा परिसराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा तसेच गुरुद्वारा परिक्रमा मार्गाची नालेसफाई केली जावी, अशी मागणी केली. विनय गिरडे पाटील यांनी सिडको येथील क्षेत्रीय कार्यालय पूर्वीच्या ठिकाणी (मातृसेवा केंद्राच्या पहिल्या माळ्यावर) स्थलांतरीत करुन सिडकोचे मंगल कार्यालय सार्वजनिक वापराकरिता खुले करण्याची मागणी केली.

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.