nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :08-Jan-2013
मध्यवर्ती बसस्थानक व एस. टी. आगार शहराबाहेर हलवा 


महापालिकेची एस. टी. महामंडळाला सूचना

नांदेड, दि.8: मध्यवर्ती बसस्थानक आणि एस. टी. आगार शहराबाहेर हलवण्यासाठी विभागीय नियंत्रक आणि स्थानिक आगारप्रमुख यांनी संयुक्तपणे प्रस्ताव तयार करुन त्यांच्या पातळीवर एकत्रित प्रयत्न करावेत, अशी सूचना महापालिकेचे अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी यांनी एस. टी. महामंडळाच्या स्थानिक अधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेदरम्यान केली.

शहर बससेवेचे सक्षमीकरण व समस्यांची सोडवणूक करण्यासाठी अप्पर आयुक्तांच्या कक्षात सोमवारी (दि.7) एक बैठक झाली. बैठकीस एस. टी. महामंडळाचे नांदेड आगारप्रमुख बी. एच. मोरे, वाहतूक नियंत्रक एम. एच. कागणे, महापालिकेचे उपअभियंता (यांत्रिकी) राजकुमार वानखेडे, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा यांची उपस्थिती होती.

मध्यवर्ती बसस्थानक हलवण्याचे नियोजन पूर्वीच झाले होते, परंतु एस. टी. महामंडळाकडून ठोस प्रयत्न झाले नसल्याने तो बाजूला पडला. शहरातील वाहतुकीचा ताण पेलायचा असेल तर बसस्थानक आणि एस. टी. आगार अशी दोन्ही ठिकाणे बाहेर हलवणे आवश्यक आहे. याची अंमलबजावणी झाली तर शहरात येणार्‍या महामंडळ आणि बसेसचे प्रमाण अत्यंत कमी होईल. त्याचबरोबर अनेक ऑटोरिक्षा नव्या ठिकाणी थांबून प्रवाशांची वाहतूक करु शकतील. त्यामुळे त्यांचा रोजगार वाढेल. ज्यांना शहरात यायचे नाही, त्यांना आपल्या नियोजीत ठिकाणी पोहचण्यासाठी अधिक कालावधी लागणार नाही.30-40 वर्षापूर्वी बसस्थानक असताना शहराची असलेली गरज आणि आजची शहराच्या वाहतुकीची गरज यात खूप फरक आहे.
वाहतुकीत अडकून पडावे लागल्याने एस. टी. बसला देखील अधिक इंधन लागून त्यांचे आर्थिक नुकसान होते आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन एस. टी. महामंडळाने शक्य तितक्या लवकर बसस्थानक शहराबाहेर सुरुक्षित ठिकाणी हलवावे, असे गगराणी यांनी एस. टी. च्या अधिका-यांना सांगितले.

तोटा कमी करण्यात यश
शहर बससेवा एप्रील ते नोव्हेंबर 2011 या कालावधीत तोट्यात होती. परंतु यावर्षी आवश्यक तेथेच आणि वर्दळीच्या ठिकाणीच अधिक प्रमाणात बसेसच्या फेर्‍या केल्यामुळे तोट्याचे प्रमाण बर्‍याच अंशी कमी झाल्याचा दावा आगारप्रमुख मोरे यांनी या बैठकीत केला. सदर कालावधीत उत्पन प्रमाण 2 कोटी 26 हजार 23 हजारावरुन 2 कोटी 47 लाख 8 हजारांपर्यंत पोहचून 20.85 टक्क्यांनी वाढ झाली.प्रती किलोमीटर सरासरीत 21.93 हून 23.34 पर्यंत तर भारमान 54.07 हून वाढून 62.47 पर्यंत पोहचले असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

उत्पन्नाची पर्यायी साधने संयुक्तपणे निर्माण करणार
शहर बस सेवेच्या माध्यमातून एस. टी. महामंडळाने तिकिटाशिवाय अन्य प्रकारच्या उत्पन्नाकडे लक्ष दिले नाही. याबाबत तांत्रिक अडचण असल्याचे एस. टी. च्या वतीने सांगितल्यानंतर महापालिकेकडून शहर बसवर आणि आतमध्ये विविध प्रकारच्या जाहिराती प्रसिध्द करण्यास परवानगी देण्यासाठी जाहिरात अभिकर्त्याची नेमणूक करुन येणा-या उत्पन्नाचा महापालिका आणि एस. टी. महामंडळाने समान प्रमाणात वाटा निश्चित करण्याचा गगराणी यांनी सुचवलेला पर्याय एस, टी. अधिका-यांनी मान्य केला. त्याचबरोबर रेल्वेस्टेशनसमोरील मोकळी असलेली शहर बसस्थानकाची जागा ही एस. टी. महामंडळाची असून तेथे मोठे शहर बसस्थानक आणि शहरात महत्वाच्या ठिकाणी संयुक्तपणे बीओटी तत्वावर बसथांब्यांची उभारणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.