nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :07-Jan-2013
कर भरण्यासाठी टाळाटाळ करणार्‍या शहरातील 12 मालमत्तांना मनपाचे सील 


...तर 5 दिवसानंतर आता मुलभूत सुविधा बंद करुन जप्ती

नांदेड, दि.7: महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणार्‍या अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आठ तर सिडकोत 4 अशा 12 मालमत्तांना महापालिकेच्या करवसुली पथकाने सील ठोकले आहे. सहाय्यक आयुक्त गुलाम सादेख आणि अविनाश आटकोरे यांनी ही कारवाई केली. संबधित मालमत्ताधारकांनी पाच दिवसात कराची रक्कम भरली नाही, तर जप्तीची कारवाई करुन पाणीपुरवठा, ड्रेनेजलाईन कनेक्शन बंद केले जाईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

महापालिकेचा मालमत्ता कर थकवणार्‍या थकबाकीदारांचा शोध घेऊन त्यांच्या मालमत्तेला सील लावण्याची मोहिम महापालिकेने महिन्याभरापासून सुरु केली आहे. दुसरीकडे 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2012 असे दोन महिने मालमत्ताधारकांनी संपूर्ण कर भरला तर करावरील शास्ती 100 टक्के माफ करण्याची योजना महापालिकेने राबवली. त्यामुळे वसुलीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक दिवसापासून कर थकवणार्‍या मालमत्ताधारकांना शोधून त्यांच्या घर/दुकानाची जप्ती करण्याचे धोरण महापालिकेने स्विकारले आहे. त्याअंतर्गत सोमवारी अशोकनगर क्षेत्रीय कार्यालय क्र. 2 अंतर्गत गोकुळनगर भागातील नारायणसा देवमाणसा व सौ सुनिता महेंद्रकुमार आहोळ (21 हजार 608 रुपये), सुनिता महेंद्रकुमार आहोळ, 2 मालमत्ता (28 हजार 648 रुपये), सुवर्णमाला सुदर्शन बाडे, 2 मालमत्ता (28 हजार 157 रुपये), नारायणसा देवमाणसा (12 हजार 778), सौ. रिता विलासकुमार कान्हेड (17 हजार 868 रुपये) तसेच सौ. त्रिशुला डॉ. अशोक आहोळ (15 हजार 797 रुपये) असे एकूण एक लाख 25 हजार 156 रुपयांची वसुली करण्यासाठी त्यांच्या घराला सील ठोकले.

त्याचबरोबर सिडको भागातील सोपान भोजाजी डुकरे (19 हजार 142), विठ्ठल शेटीबा कांबले (12 हजार 733 रुपये), कचरु लक्ष्मणॅ (16 हजार 615 रुपये) आणि कचरु कल्याणकर (16 हजार 115 रुपये) असा मालमत्ताकराचा करभरणा केलेला नव्ह्ता. त्याकरिता त्यांच्याही घरांना सील ठोकण्यात आले. या मोहिमेत अशोकनगर कार्यालयाचे बी. जी. डांगे, गणेश गुंडेवार, शेषेराव पातकुटवार, दिलीप इंगोले, पुरुशोत्तम कमतगीकर, मुकेश डोईजड, तर सिडकोतील कारवाईत पद्माकर कवळे, श्रीकांत चौदंते, भालचंद्र चामे, अ. हबीब अ. रशीद, घाळे, रणजीत जोंधळे, वाघमारे, तडवी, ढगे आदींनी सहभाग घेतला.

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.