![]() | ||
| ||
समाचार |
|
Dated :07-Jan-2013 |
|
स्वच्छता व साफसफाईसाठी महापालिकेची हेल्पलाईन पुन्हा सुरु | |
26 26 26 नांदेड, दि. 7: महापालिकेच्या हद्दीतील स्वच्छता आणि साफसफाईच्या समस्या सोडवण्यासाठी महापालिकेचे तक्रार निवारण केंद्र (हेल्पलाईन) पुन्हा सुरु करण्यात आले आहे. नागरिकांनी 262626 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील विविध समस्येच्या तक्रारी नोंदवण्यासाठी पूर्वी स्टेडियम परिसरातील जलतरणिका इमारतीत हे केंद्र सुरु होते. परंतु क्षेत्रीय कार्यालयात तक्रारी करण्याची सोय असल्याने तसेच सदर केंद्रावर अनावश्यक दूरध्वनी कॉल्स येण्याचे प्रमाण वाढल्यामुळे मधल्या काळात ही सुविधा स्थगित करण्यात आली होती. शहरातील साफसफाईचे काम पीपीपी (लोकसहभागातील भागीदारी) तत्वावर दिल्यानंतर या सेवेबद्दल असलेल्या समस्या सोडवण्यासाठी एका विशिष्ट यंत्रणेची गरज होती. त्याकरिता हेल्पलाईनची सुविधा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे नियमित किंवा ठरलेल्या दिवशी घंटागाडी येत नाही, नालेसफाई वेळेवर केली जात नाही, कामगारांबद्दल तक्रारी, घनकचरा सेवा शुल्कापेक्षा अधिक रक्कमेची मागणी, पावती दिली नसल्याची तक्रार, मृत जनावरे उचलली जात नाहीत, घाण साचलेली असेल, अशा वेळी नागरिकांनी 262626 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपली समस्या सांगावे. कॉल करणार्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेण्याची स्वतंत्र व्यवस्था येथे करण्यात आली असून नागरिकांनी आपले नाव, पत्ता, समस्या, मोबाईल क्रमांक याबद्दलची अचूक माहिती नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. घनकचरा सेवाशुल्क वसुली करणार्या व्यक्तीकडे मनपा आयुक्त आणि अभिकर्त्याच्या प्राधिकृत व्यक्तीच्या संयुक्त स्वाक्षरीचे ओळखपत्र देण्यात आले असून नागरिकांनी सदर ओळखपत्राची खातरजमा करुनच त्यांना देण्यात आलेल्या पूर्ण रक्कमेची पावती घ्यावी, अतिरिक्त रक्कम देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
==================================================================== |
|