nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :06-Jan-2013
दर्पण दिनानिमित्त महापालिकेत पत्रकारांच्या कुटुंबातील 134 सदस्यांची आधार नोंदणी  


नांदेड, दि. 6: दर्पण दिनानिमित्त रविवारी (दि.6) महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत आयोजित करण्यात आलेल्या आधार नोंदणीच्या विशेष उपक्रमात पत्रकार आणि प्रसारमाध्यम कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील जवळपास 134 सदस्यांची आधार ओळखपत्र नोंदणी करण्यात आली. महापालिकेच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल प्रसारमाध्यम कर्मचार्‍य़ांच्या कुटुंबातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तीन कीट क्षमता आणि प्रत्येक व्यक्तीस आधार नोंदणीसाठी विशिष्ट वेळ लागणे अपरिहार्य असल्याने अनेकांना वेळेअभावी परत जावे लागले.

दर्पण दिनानिमित्त रविवारी शहरात पत्रकारांसाठी अनेक कार्यक्रम झाले. परंतु महापालिकेच्या वतीने आयोजित आधार नोंदणीच्या खास सोयीमुळे पत्रकार आणि वृत्तपत्र कर्मचार्‍यांच्या कुटुंबानाही हा दिन साजरा करण्याची आणि त्यात सहभागी होण्याची संधी प्रथमच मिळाली असल्याची प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. महापौर अब्दुल सत्तार, आयुक्त जी. श्रीकांत, अप्पर आयुक्त तथा आधारचे नोडल ऑफिसर रा. ल. गगराणी यांनी दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तसेच आधार नोंदणीच्या विशेष मोहिमेची माहिती घेतली. जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा यांच्या नियोजनानुसार महापालिकेच्या आधार विभागाचे सतीश महाबळे, सुपरवाझर कृष्णा गिरी, संगणकचालक विष्णू ठोके, अंजली देवकांबळे, हर्षद खान, मधूसुदन पांचाळ, मनपा पोलिस पथकातील कर्मचारी जावेदखान, बालाजी गाजेवार, सय्यद युसूफ, राजकुमार शेंडगे यांनी या उपक्रमासाठी महत्वाची भूमिका बजावली.

सकाळी 11 ते 4 असा वेळ आधार नोंदणीसाठी निर्धारीत करण्यात आला होता. परंतु पत्रकारांना दिलेल्या टोकणची नोंदणी पूर्ण करण्यासाठी रात्री 8 वाजले. एका कीटअंतर्गत एका दिवसात सरासरी 40 इतकीच आधार नोंदणी करता येणे शक्य असते. एका व्यक्तीची नोंदणी करताना त्यांच्या बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बुबुळाची स्कॅनिंग, छायाचित्र घेणे, तसेच माहिती अचूकपणे संगणकात समाविष्ट करणे याकरिता साधारणत: 10 मिनिटे इतका सरासरी वेळ लागतो. महापालिकेने एकूण तीन कीटची व्यवस्था चारचाकी वाहनतळ परिसरातील पोलिस पथक कक्षात केली होती. पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना रांगेत अधिक वेळ उभे राहण्याचे श्रम वाचवण्यासाठी स्थायी समिती सभागृह येथे विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली होती. एकाच दिवसात सर्वांचीच नोंदणी होणे शक्य नसल्याने बर्‍याच लोकांना परत जावे लागले.

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.