nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
सन्माननीय सदस्य व स्विकृत सदस्य यादी ||  
समाचार

Dated :05-Jan-2013
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घेतली महापौर, आयुक्तांची भेट 

महापालिका क्षेत्र अभ्यास दौर्‍यानिमित्त संवाद

नांदेड, दि.6: जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शनिवारी (दि.5) महापालिका प्रशासकीय इमारतीस भेट देऊन महापौर अब्दुल सत्तार, आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह काही पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकार्‍यांशी संवाद साधला.

समाजकार्य शाखेतील महानगरपालिकेच्या स्तरावरील सामाजिक कार्य या विषयाशी संबधित माहिती घेण्यासाठी संबधित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज नांदेडला भेट दिली. यावेळी संबधित महाविद्यालयाचे प्रा. मारुति गायकवाड आणि प्रा. राहूल निकम हे त्यांच्यासोबत उपस्थित होते. महापालिकेत महापौर अब्दुल सत्तार यांच्या बैठक कक्षात त्यांच्यासह सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, बाळू खोमणे, अमितसिंघ तेहरा, साबेर चाऊस यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. त्यानंतर आयुक्त जी. श्रीकांत यांच्या दालनात जाऊन त्यांच्याशीही चर्चा केली.

महापौर आणि आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन करित महापालिकेच्या स्तरावरील कामकाजाबाबत अधिक माहिती दिली. तत्पूर्वी जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, उद्यान अधिक्षक डॉ. मिर्झा बेग, विद्युत विभागाचे उप अभियंता सतीश ढवळे यांनी स्थायी समिती सभागृहात महापालिकेच्या स्तरावरील कामकाज, उद्देश, रचना व इतर बाबींशी संबधित माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध दालनांना भेट देऊन त्याची पाहणीही केली. सायंकाळी उशीरा या विद्यार्थ्यांनी गोविंदबाग येथील जगप्रसिध्द ‘लेझर शो’चा आस्वाद घेतला.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.