nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :05-Jan-2013
रस्त्यावर सांडपाणी सोडणार्‍या मंगल कार्यालयास दोन हजाराचा दंड 

महापालिकेची कारवाई

नांदेड, दि.5: मंगल कार्यालयातील समारंभातून निर्माण झालेले घाण सांडपाणी सार्वजनिक रस्त्यावर सोडणार्‍या कौठा येथील शिवाजी मंगल कार्यालयास महापालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालयाने शनिवारी (दि.5) दोन हजार रुपयांचा दंड ठोठावून वसुल केला आहे.

क्षेत्रिय कार्यालय सिडको (क्र. 5) अंतर्गत असलेल्या कौठा येथील शिवाजी मंगल कार्यालयात (पतसंस्था) वेळोवेळी होणार्‍या समारंभामुळे जमा झालेल्या घाण सांडपाण्याबाबत येथील नागरिकांच्या वारंवार तक्रारी होत्या. त्यामुळे आज दि. 5 जानेवारी रोजी सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गुलाम म. सादेख यांच्यासह इमारत निरिक्षक रणजीत जोंधळे, पद्माकर कावळे, किशन वाघमारे, वसीम तडवी, स्वच्छता निरिक्षक ढगे, यांनी कौठा येथील शिवाजी मंगल कार्यालयास भेट दिली असता मंगल कार्यालयातील लग्न समारंभ व इतर कार्यक्रमातील अनावश्यक असलेले घाण सांडपाणी सार्वजनिक जागेत सोडल्याचे निदर्शनास आले तसेच सदर ठिकाणी सांडपाण्याची नि:सारणाची कोणतीही व्यवस्था केली नसल्यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 166 (अ) मधील तरतुदीनुसार सार्वजनिक जागेत सांडपाणी सोडल्याबद्दल संबधित मंगल कार्यालयास दोन हजार रुपयांचा तात्काळ दंड आकारण्यात आला. शहरात अशा प्रकारचे गैरकृत्य आढळून आल्यास त्यांच्याविरूध्दही अशीच दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.