nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :04-Jan-2013
दर्पण दिनानिमित्त पत्रकारांच्या कुटुंबासाठी महापालिकेत उद्या आधार नोंदणीची खास सुविधा 


नांदेड, दि. 4: दर्पण दिनानिमित्त नांदेड महापालिकेच्या वतीने पत्रकार आणि सर्व प्रसारमाध्यम कर्मचार्‍य़ांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आधार ओळ्खपत्र नोंदणीची खास सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रविवारी (दि.6) सकाळी 11 ते दुपारी 4 यावेळेत महापालिका प्रशासकीय इमारतीच्या चारचाकी वाहनतळाच्या पोलिस पथक कक्षात आधार नोंदणी करण्यात येईल. या सुविधेचा सर्व पत्रकार बांधव तसेच प्रसारमाध्यम कर्मचार्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त जी. श्रीकांत, अप्पर आयुक्त तथा नोडल ऑफीसर रा. ल. गगराणी यांनी केले आहे.

कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठी वृत्तसृष्टीतील पहिले वर्तमानपत्र सुरु केले होते. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्रात दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आधार ओळखपत्र शासकीय कामकाजासह अनेक ठिकाणी बंधनकारक असल्याने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने यावर्षी या दिनानिमित्त रविवारी (दि.6) वृत्तपत्र किंवा इतर प्रसारमाध्यमात काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आधार ओळखपत्र नोंदणीची खास सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

फक्त प्रसारमाध्यमांसाठीच सुविधा
ज्यांनी पहिल्या टप्प्यात आधार नोंदणी केलेली आहे, परंतु त्यांना अद्याप प्रत्यक्ष ओळखपत्र प्राप्त झाले नाही, अशांना शासन निर्देशानुसार प्रत्यक्ष ओळखपत्र मिळेपर्यंत आधार ओळखपत्राची डिजीटल स्वाक्षरी केलेली प्रत उपलब्ध करुन घेता येईल. त्याकरिता संबधितांनी पूर्वी नोंदणी केलेली पावती सोबत आणावी. नोंदणी व आधार प्रत मिळण्याची सुविधा फक्त प्रसारमाध्यमातील कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठीच उपलब्ध असून मित्र, नातेवाईक यांना कृपया नोंदणीसाठी सोबत आणू नये. असे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
नोंदणीसाठी येताना फोटो ओळख असल्याचे मान्य करता येण्यायोग्य ओळखपत्र तसेच रहिवासी पुरावा असलेले कोणतेही प्रमाणित कागदपत्र यांची मूळ व झेरॉक्स प्रतीक्षा सोबत आणणे आवश्यक असून विशेष सुविधेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी प्रसारमाध्यम कर्मचार्‍यांनी आपले ओळखपत्र किंवा संपादकाचे शिफारसपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.