nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
सन्माननीय सदस्य व स्विकृत सदस्य यादी ||  
समाचार

Dated :03-Jan-2013
सावित्रीबाईंनी महिलांमध्ये शिक्षणातून आत्मविश्वास जागवला- प्रा. ललिता बोकारे 


नांदेड, दि. 3: चार भिंतीपलिकडे शिक्षण पध्दत अस्तित्वात नसताना सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची बीजे रोवून महिलांमध्ये आत्मविश्वास जागवला, असे प्रतिपादन नगरसेविका डॉ. सौ. ललिता बोकारे यांनी गुरुवारी (दि.3) महापालिकेच्या वतीने आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात केले.

उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका प्रशासकीय इमारतीच्या प्रशिक्षण सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, नगरसेविका डॉ. करुणा जमदाडे, प्रा. डॉ. ललिता बोकारे, शांताबाई कोकाटे, वैशाली देशमुख, रजिया बेगम, नगरसेवक किशोर यादव, मुख्य लेखा परिक्षक शिवप्रसाद चन्ना, मुख्य लेखाधिकारी पी. पी. बंकलवाड, शहर अभियंता गिरीश कदम, सहाय्यक आयुक्त संजय जाधव, एस. टी. मोरे, गुलाम सादेक, अविनाश आटकोरे, सुधीर इंगोले, जगदीश कुलकर्णी, सादेक खान, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, प्रकल्प संचालक अशोक सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. यावेळी महिलांसाठी आयोजित स्पर्धा सप्ताहाचे उदघाटन नगरसेविका रजिया बेगम यांच्या हस्ते झाले.

उपमहापौर आनंद चव्हाण यांनी आपल्या मनोगतात दिल्लीच्या घटनेमुळे सार्‍या देशाने नववर्षाचा जल्लोष न करणे, ही खरी भारतीय संस्कृती असल्याचा उल्लेक्ख केला. पार्वती कापसे यांनी स्वागत गीत गायले. मृदुला देशपांडे यांनी सावित्रीबाईची ओवी गाऊन सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन शीला हिरवे यांनी केले. कार्यक्रमास महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.