nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :03-Jan-2013
नांदेड शहराच्या वाहतूक प्रश्नांसंबंधी अभ्यास गट नेमावा 

महापालिकेतील बैठकीत नागरिकांचे मत

नांदेड, दि. 3: नांदेड शहरातील वाहतूक विस्कळीत होण्यामागे अनेक प्रकारची कारणे आहेत. त्याचा शोध घेऊन उपायासंबंधी शिफारस करण्यासाठी स्वयंस्फुर्तीने काम करणारा अभ्यास गट नेमून सर्वांना लाभदायक ठरेल अशी ठोस पावले उचलली जावीत, अशी मते महापालिकेत गुरुवारी (दि.3) आयोजित बैठकीत अनेक नागरिकांनी मांडली.

केंद्र सरकारच्या नागरी रस्ते वाहतूक विभागाच्या निर्देशाप्रमाणे काम करणार्‍या अर्बन मास ट्रॉंझीट कंपनीच्या वतीने नांदेडच्या वाहतूक व्यवस्था, प्रदूषण, सायकल ट्रॅक अशा वेगवेगळ्या निवडक दहा मुद्यांवर संशोधन करुन तयार केलेल्या अहवालावर चर्चा करण्यासाठी स्थायी समिती सभागृहात बैठक बोलावण्यात आली होती. अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक श्रीरंग निम्मनवाड, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी देवकते, एस.टी. महामंडळाचे विनोद चव्हाण, सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक, आटकोरे, सुधीर इंगोले, एस. टी. मोरे, परिवहन अधिकारी राजकुमार वानखेडे, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, उद्यान अधिक्षक मिर्झा बेग, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, उपअभियंता सतीश ढवळे, बाबरे, टाकळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक रजत बोस आणि हेमंत चौरसिया यांनी सादरीकरण करुन अहवालाची पार्श्वभूमी व पाहणीत आढळलेल्या बाबींची माहिती दिली. पाहणीदरम्यान आढळलेल्या बाबींमध्ये उपस्थित नागरिक, ऑटो संघटनेचे प्रतिनिधी यांनी प्रदुषण, फूटपाथ वापर, सायकल ट्रॅक वापर, खाजगी वाहनांचा वेग या घटकांबाबत आवश्यक ती दुरुस्ती करुन घेण्याबाबत सूचना केली. कंपनीने बैठकीत सादर केलेला अहवाल महानगरपालिकेच्या www.nwcmc.gov.in या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध ठेवला जाणार असून संकेतस्थळावर अथवा महापालिकेकडे लेखी स्वरुपात येत्या 18 जानेवारी 2013 पर्यंत आपली मते नोंदवावीत. त्याव्यतिरिक्त आणखी काही सूचना करावयाच्या असल्यास त्यादेखील परंतु स्वतंत्रपणे कराव्यात, असे आवाहन अप्पर आयुक्त गगराणी यांनी या बैठकीत केले. या बैठकीस हर्षद शहा, उमाकांत जोशी, डॉ. संजय पाटील, चंदन बोरा, योगेश लाठकर, रोहन मेगदे यांच्यासह सामाजिक माध्यम समूहातील नागरिक, शहर विकास समितीचे पदाधिकारी, ऑटो संघटनेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.