nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :02-Jan-2013
20 दिवसात 3897 जणांची आधार नोंदणी- गगराणी 

नांदेड, दि. 2: महापालिका हद्दीत गेल्या 12 डिसेंबरपासून सुरु झालेल्या आधार ओळखपत्र नोंदणीच्या दुसर्‍या टप्प्यात दि. 31 डिसेंबरअखेर (20 दिवसात) तीन हजार 897 नागरिकांच्या ओळखपत्र नोंदणीचे काम पूर्ण झाल्याची माहिती नोडल ऑफीसर तथा मनपाचे अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी यांनी दिली.

आधार योजना राबवण्यात महाराष्ट्र अग्रेसर असून देशात सर्वाधिक आधार नोंदणीचे काम महाराष्ट्रात झाले आहे. नांदेड शहरात पहिल्या टप्प्यात आधार नोंदणीचे लक्षणिय काम झाले असून दि. 12 डिसेंबर 2012 रोजी दुसर्‍या टप्प्यास सुरुवात झाली आहे. दररोज 50 जणांची आधार नोंदणी याप्रमाणे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिवाजीनगर, अशोकनगर, इतवारा, वजीराबाद, सिडको व तरोडा अशा सहाही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण दहा ठिकाणी आधार नोंदणीचे काम सुरु आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी टोकन देऊन प्रतिक्षा क्रमांक निश्चित करण्यात येत आहेत. आधार नोंदणीसाठी आणखी कीट उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. त्याकरिता नागरिकांनी घाई करू नये आणि सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पहिल्या टप्प्यातील ओळखपत्र मिळाले नसल्यास....
योजनेच्या पहिल्या टप्प्यात ज्या नागरिकांनी आधार नोंदणी केली होती, परंतु त्यांना अद्याप प्रत्यक्ष ओळखपत्र मिळालेले नाहीत, अशा नागरिकांना ओळख प्राधिकरणाकडून डिजीटल स्वाक्षरी केलेले ओळखपत्र eaadhaar.uidai.gov.in या वेब पोर्टलवर उपलब्ध करण्यात आले आहे. आधारचे प्रत्यक्ष ओळखपत्र प्राप्त होईपर्यंत संबधित नागरिकांना त्यांना दिलेल्या पावतीवरील नोंद जुळवून वेब पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर त्यांच्या आधार पत्राची प्रत छापता येईल.

दोन रुपयांत ‘आधार’ची इंटरनेट प्रत
ज्यांच्याकडे इंटरनेट, प्रिंटर्सची सुविधा नाही, अशा रहिवाश्यांसाठी महा-ई-सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र येथून दोन रुपये शुल्क दिल्यानंतर आधार पत्राची छापील प्रत उपलब्ध करुन घेता येईल. याबाबत शासन निर्णय झाला असून त्याची प्रत महानगरपालिकेच्या www.nwcmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वेब पोर्टलवरुन प्रत मिळण्याची सुविधा फक्त पहिल्या टप्प्यात नोंदणी केल्यानंतर ज्यांना आधार ओळखपत्र मिळालेले नाहीत, अशाच नागरिकांसाठी आहे. दुसर्‍या टप्प्यात नोंदणी केलेल्या नागरिकांची आधार प्रत उपलब्ध करण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे.

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.