nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
जाहिर लिलाव सूचना : - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीतील तयबाजारी, आठवडी बाजार, दैनिक जमिन भाडे (नो हॉकर्स झोन वगळून) भाडे वसुलीचा मक्ता ताबा देणे बाबत. || नांवाशमनपा जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :01-Jan-2013
वाहतूक समस्येच्या संशोधनावर चर्चेसाठी उद्या महापालिकेत बैठक  नांदेड, दि. 1: नांदेड शहरातील वाहतूक समस्येसंदर्भात नवी दिल्ली येथील सेवाभावी संस्थेने केलेल्या संशोधन अहवालावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी (दि.3) सकाळी 11 वाजता महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात वाहनधारक व नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

नवी दिल्लीच्या अर्बन मास ट्रॉंझीट कंपनी यांने नांदेड शहरातील वाहतूक, प्रदुषण, फूटपाथ, सायकल ट्रॅक आदी मुद्यांवर संशोधन करुन अहवाल तयार केला आहे. त्याचे सादरीकरण या बैठकीत केले जाणार असून वाहतूक व्यवस्थेतील विविध समस्येचे निवारण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीस शहरातील नागरिक, वाहतूक प्रश्नावरील अभ्यासक, सामाजिक माध्यमाच्या नांदेड आय केअर, नांदेडीयन्स, हमारा नांदेड समूहातील सदस्य, मालवाहतूक संघ, रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.