nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
जाहिर लिलाव सूचना : - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीतील तयबाजारी, आठवडी बाजार, दैनिक जमिन भाडे (नो हॉकर्स झोन वगळून) भाडे वसुलीचा मक्ता ताबा देणे बाबत. || नांवाशमनपा जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :31-Dec-2012
अशोकनगर झोनमधील 95 भूखंडधारकांना जप्तीच्या नोटीसा 


मालमत्ता कर भरा अन्यथा प्लॉटची विक्री करुन वसुली

नांदेड, दि. 31: गेल्या अनेक वर्षापासून मालमत्ता कराचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अशोकनगर (क्षेत्रिय कार्यालय क्र.2) झोनमधील भागातील तब्बल 95 खुल्या प्लॉटधारकांना महापालिकेने 15 दिवसाची अंतीम नोटीस बजावली असून या कालावधीत संपूर्ण कराचा भरणा केला नाही तर त्यांचे मोकळे प्लॉट जप्त करुन मालमत्ता कराची रक्कम वसूक करण्याचा इशारा सहाय्यक आयुक्त अविनाश आटकोरे यांनी दिला आहे.

अशोकनगर (क्षेत्रिय कार्यालय क्र.2) झोनतर्गत विविध ठिकाणी खुल्या प्लॉटची नोंदणी स्वत:च्या नावावर करुन घेतल्यानंतर अनेक भूखंडधारकांनी महापालिकेचा मालमत्ता कर भरण्याकडे दुर्लक्ष केले. शारदानगर, गीतानगर, कैलासनगर, हिंगोली रोड, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, लक्ष्मीनगर, पोर्णिमानगर, सुंदरनगर, आनंदनगर, गांधीनगर, वाहतुकनगर, रायगडनगर, विस्तारित नाथनगर, शाहूनगर, टिळकनगर, बाबानगर, नंदीग्राम सोसायटी, बर्‍ह्यामसिंघ नगर, म्हाळजा, तानाजीनगर, गोकुळनगर, दरवेशनगर, मित्रनगर, पुरुषार्थनगर, सांगवीतील अंबानगर, गोपाळनगर, सिध्दार्थनगर, बाजीरावनगर, शिवनेरीनगर, सांगवी बु. अशा विविध भागात खुले भूखंड असलेल्या मालमत्ताधारकांची जागा ही मोकळी जागा असून त्यांच्याकडे 31 मार्च 2013 अखेर एकूण 18 लाख 238 रुपयांचा मालमत्ता कर थकित आहे.

अशा स्थितीत महापालिकेने जाहीर सूचनेद्वारे सर्व थकबाकीदारांना त्यांच्याकडील मालमत्ता कर भरण्याची अंतीम सूचना देण्याचे आयुक्त जी. श्रीकांत व उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सूचित केले होते. अशोकनगर (क्षेत्रिय कार्यालय क्र.2) झोनमधील 95 भूखंडधारकांना जाहीर नोटीस बजावण्यात आली आहे. 15 दिवसात संबधितांनी महापालिकेच्या कार्यालयात येऊन त्यांच्याकडील संपूर्ण कराचा भरणा केला नाही तर त्यांच्या खुल्या भूखंडाची जप्ती करुन जाहीर लिलाव करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

भूखंडधारकांची यादी येथे उपलब्ध
अशोकनगर (क्षेत्रिय कार्यालय क्र.2) झोनमधील नोटीसा बजावण्यात आलेल्या भूखंडधारकाचे नाव, कर थकलेल्या मालमत्तेचा क्रमांक व त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम असा सर्व तपशील नांदेड महापालिकेच्या www.nwcmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संबधितांनी खुल्या भूखंडावरील मालमत्ताकर तातडीने भरावा, सदरचा भूखंड अन्य कोणी खरेदी केलेल असेल तर संबधितांनी नाव परिवर्तनाचा अर्ज दाखल करुन मालमत्ता कराची रक्कम सर्वप्रथम भरावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अविनाश आटकोरे यांनी केले आहे.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.