nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :31-Dec-2012
नवे वर्ष, नवा प्रभाग आणि साफसफाईचे नवे नियोजन  

आजपासून अंमलबजावणी सुरु

नांदेड, दि. 31: नांदेड वाघाळा शहर मनपा क्षेत्रात वार्डाऐवजी प्रभाग पध्दत लागू झाल्याने महापालिकेने आपल्या दैनंदिन कामकाजात नव्या प्रभाग निकषाची अंमलबजावणी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सुरु करण्याचा संकल्प केला आहे. त्याकरिता पूर्वी वार्डाप्रमाणे केली जाणारी नियमीत साफसफाई मंगळवारपासून (दि.1 जानेवारी) आता प्रभागनिहाय करण्यात येणार असून मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी स्वच्छता विभागाच्या मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीच्या तपशीलासह त्यांची वेळ निश्चित करुन तसे आदेशच निर्गमित केले आहेत.

महापालिकेच्या विविध क्षेत्रिय कार्यालय तसेच स्वच्छता विभागाच्या देखरेखीखाली दररोज नियमितपणे शहर साफसफाईचे काम सुरु असते. रस्ते व परिसर स्वच्छ करण्याचे काम महापालिकेतील स्वच्छता कामगारांमार्फत, तर हा तसेच नागरिकांच्या घर/प्रतिष्ठाणांमधून गोळा झालेला कचरा उचलून वाहतुकीद्वारे डंपींग ग्राऊंडवर नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचे काम खाजगी घनकचरा ठेकेदारामार्फत केले जाते. पूर्वी स्वच्छता निरिक्षकांना कमी अधिक प्रमाणात वार्डाच्या जबाबदारीचे विभाजन केले गेले होते. त्यात सुधारणा करणे आवश्यक होते. त्याचबरोबर स्वच्छता निरिक्षकांना त्यांच्या कार्यक्षमतेप्रमाणे कामाची जबाबदारी देण्याचे नियोजन नव्याने करण्यात आले आहे.

कामावर उशीरा आल्यास अहवाल द्या
साफसफाई करण्यासाठी मनपा कर्मचारी व ठेकेदाराचे कामगार यांच्यासाठी सकाळी 6 ते दुपारी 2 तर घनकचरा अँपे, ट्रॅक्टर व त्यावरील मजुरांसाठी सकाळी 7 ते दुपारी 3 अशी वेळ निर्धारित करण्यात आली आहे. काम सुरु होण्याच्या वेळेनंतर कर्मचारी किंवा यंत्रसामुग्री आल्यास कामावर घेऊ नये तसेच त्याचा स्वतंत्रपणे अहवाल द्यावा, असेही या आदेशात म्हटले आहे.

यंत्रणा, कामगारांची नावासह यादी संकेतस्थळावर
विविध नूतन प्रभागात साफसफाईच्या कामावर नियंत्रण ठेवणार्‍या स्वच्छता निरिक्षक, पुरुष मजूर, महिला मजूर यांची नावनिहाय तर ठेकेदाराच्या कामगारांची संख्या व त्यांची यंत्रसामुग्री याची प्रभागनिहाय यादी मनपाचे सर्व पदाधिकारी व नगरसेवकांना देण्यात आली असून सदर यादी महापालिकेच्या www.nwcmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे आता कोणालाही कोणत्याही प्रभागात कोणता मजूर व यंत्रणा कामावर आहे, याची योग्य माहिती घेऊन संपर्क करणे सोयीचे होणार आहे.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.