![]() | ||
| ||
समाचार |
|
Dated :29-Dec-2012 |
|
महापालिकेच्या पाणीपुरवठा वेळापत्रकात 1 जानेवारीपासून बदल | |
नांदेड, दि. 29: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केल्या जाणार्या विविध भागातील वेळापत्रकात मंगळवार, दि. 1 जानेवारी 2013 पासून बदल करण्यात येत असून जनतेने या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शहरातील काही भागांना भल्या पहाटे किंवा अवेळी पाणीपुरवठा होत असल्याच्या मुद्यांबाबत सर्वसाधारण सभेत नगरसेविका स्नेहा पांढरे यांच्यासह इतर नगरसेवक व नगरसेविकांनी नुकताच विषय उपस्थित केला होता. तत्पूर्वी काही नागरिकांनीही मनपाकडे लेखी निवेदनाद्वारे पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाची फेररचना करण्याची मागणी केली होती. महापालिकेकडे असलेली यंत्रसामुग्री, विष्णुपूरी जलाशयातून मिळणारे पाणी, जलकुंभ भरण्यासाठी लागणारा अवधी तसेच विविध व्हॉल्ववरुन सोडता येणारे पाणी याचा एकत्रीत अभ्यास करुन विविध भागात सध्या होत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या वेळा बदलण्याचा तर काही भागातील वेळापत्रक जशास तसे कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन वेळापत्रक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तसेच महापालिकेच्या www.nwcmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, तसेच पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
====================================================================
====================================================================
==================================================================== |
|