nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
प्रगटन – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड च्या सर्व सेवानिवृत्त /कुटुंब निवृत्त वेतनधारक यांनी हयात रजिष्टरवर सही केलेले नाही अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी दि. 31.05.2022 पर्यंत मनपा मुख्य ईमारततील लेखा विभाग खोली क्रं. 311 मध्ये येवून हयात रजिष्टरवर सही करणेसाठी अवगत करावे. || मनपा नांदेड, साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदला बाबत ||  
समाचार

Dated :29-Dec-2012
मालमत्ता कर थकवल्याने सिडकोत दोन मालमत्ता सील  


नांदेड, दि. 29: महापालिकेचा मालमत्ता कर थकवणार्‍या दोन मालमत्तांना शनिवारी (दि.29) मनपा सिडको क्षेत्रिय कार्यालयाच्या वसुली पथकाने सील ठोकले. सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक व त्यांच्या सहकार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सिडको क्षेत्रीय कार्यालयांअतर्गंत (क्र.5) चंद्रकांत व लक्ष्मण बाबाराव काळे यांच्या क्र. 11-2-139 या मालमत्तेच्या करापोटी त्यांच्याकडे 18 हजार 557 रुपये तसेच गजानन पारोजी काळे यांच्याकडे मालमत्ता क्र. 11-2-137 च्या करापोटी 16 हजार 99 थकबाकी येणे आहे. महापालिकेने मागणी बील व नोटीसा पाठवूनदेखील संबधितांनी आपल्याकडील कराचा भरणा करण्यास टाळाटाळ केली.
शनिवारी त्यांच्याकडे करवसुली व जप्ती पथक गेल्यानंतरही त्यांनी कराचा भरणा करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्या मालमत्तांना सील ठोकणात आले. आयुक्त जी. श्रीकांत, अप्पर आयुक्त राम गगराणी, उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांच्या नेतृत्वाखाली पद्माकर कावळे, श्रीकांत चौदंते, भालचंद्र चामे, अ. हबीब अ. रशीद, अशोक घाळे, मालू ऐनफळे, पवळे, पटणे, भालेराव यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. इतर मालमत्तधारकांनीही आपल्याकडील मालमत्ता कर भरुन जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.



Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.