nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :29-Dec-2012
‘पीपीपी’ प्रकल्पाद्वारे राजीव गांधी आवास योजनेची अंमलबजावणी- कासेळीकर • पाच राज्यांना निधीच्या पहिल्या टप्पाचे वितरण

• नगरसेवक, अधिकार्‍यांची कार्यशाळा उत्साहात

नांदेड, दि.29: लोकसहभागातील व्यक्तिगत भागीदारीतून (पीपीपी) झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी राजीव गांधी योजना साकारण्यात येत असून आतापर्यंत पाच राज्यांना केंद्र शासनाने 65.59 कोटी रुपयांच्या निधीचा पहिला टप्पा वितरित केल्याची माहिती मुंबई येथील वरिष्ठ संशोधन अधिकारी डॉ. सुधा कासेळीकर यांनी दिली.

झोपडपट्टीमुक्त शहर प्रकल्प तयार करण्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विभाग तसेच महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ताज पाटील येथे शनिवारी (दि.29) आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या कार्यशाळेला 30 नगरसेवक/नगरसेविका व 12 नगरसेवकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते व आयुक्त जी .श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत, अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, केंद्र शासनाच्या नागरी नियोजन विभागातील तज्ञ अर्चना हिंदजा, डॉ. मुकेश कानसकर, विभागीय कार्यक्रम समन्वयक बाळकृष्ण प्रसाद यांच्यासह नगरसेवक/ नगरसेविका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना कासेळीकर म्हणाल्या, की राजीव गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना बॅंकांनी कर्ज द्यावे, याकरिता एक हजार कोटी रुपयांचे तारण कर्ज सरकारकडे उपलब्ध आहे. जागेवरच विकास करता येणार्‍या वस्तींसाठी प्रामुख्याने ही योजना असून ‘रिफॉर्मस’ हा योजनेचा महत्वाचा भाग आहे. देशातील 34 राज्यांमध्ये नियोजनाच्या तयारीसाठी केंद्र शासनाने 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. झोपडपटीमुक्त शहर असा या योजनेचा मुख्य व अंतीम हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुक्त जी. श्रीकांत यांनी आपल्या भाषणात झोपडपट्टीतून निघून सिंमेटच्या पक्क्या घरांमध्ये वास्तव्य केल्यानंतरही अद्याप बर्‍य़ाच नागरिकांच्या दैनंदिन पारंपारिक वर्तनात बदल झाला नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. बीएसयुपी योजनेतून पायाभूत सुविधेवर खर्च करता येतो म्हणून विविध घरांमध्ये अधिक प्रमाणात अंतर ठेवून त्यांच्यासाठी पायाभूत सुविधेची उभारणी करणे चुकीचे असल्याचे निरिक्षण त्यांनी नोंदवले. उपमहापौर आनंद चव्हाण यांनी आपल्या भाषणात महापालिकेत आता पूर्वीपेक्षा अधिक सुज्ञ नगरसेवक निवडून आल्याचे सांगून सभागृहात नगरसेवकांमध्ये मतभेद राहिले तरी त्याचा विकासाच्या कामावर परिणाम होणार नाही, अशी ग्वाही दिली.

उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी प्रास्ताविकात योजनेच्या नियोजनात लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला नाही तर अंमलबजावणी करतानाही त्रुटी राहत असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधून सर्वांनी नियोजनाकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याचे आवाहन केले.

कार्यशाळेस गटनेते सय्यद शेरअली, नगरसेवक सुधाकर पांढरे, सतीश राखेवार, शंकर गाडगे, शफी अहेमद कुरेशी, किशोर यादव, चांदपाशा कुरेशी, बाळासाहेब देशमुख, हबीब बागवान, बालाजी कल्याणकर, अभिषेक सौदे, अशोक उमरेकर, तुलजेश यादव, श्रीनिवास सातेलीकर, अ. हबीब बावजीर, विनयकुमार गुर्रम, फारुख हुसैन, नगरसेविका डॉ. करुणा जमदाडे, अनुजा तेहरा, कमलबाई मुदीराज, प्रा. ललिता बोकारे, इतरत फातेमा, श्रध्दा चव्हाण, अंजली गायकवाड, सविता कंठेवाड, रजिया बेगम, सिंधू काक़डे यांच्यासह काही नगरसेवकांचे प्रतिनिधी व महापालिकेचे विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता कलीम परवेज यांनी सूत्रसंचालन केले. दुपारच्या सत्रात नगरसेवक व अधिकार्‍यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देऊन केंद्र शासनाच्या प्रतिनिधींनी शंका निरसन केले.

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.