nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :28-Dec-2012
सिडकोतील सव्वाशे खुल्या प्लॉटवर जप्तीची ‘संक्रात’ येणार 

25 लाखाचा मालमत्ताकर भरण्यासाठी 15 दिवसांची अंतीम मुदत

नांदेड, दि.28: गेल्या अनेक वर्षापासून मालमत्ता कराचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या सिडको भागातील तब्बल 125 खुल्या प्लॉटधारकांना महापालिकेने 15 दिवसाची अंतीम नोटीस बजावली असून या कालावधीत संपूर्ण कराचा भरणा केला नाही तर त्यांच्या मोक़ळ्या प्लॉटचा जाहीर लिलाव करुन कराची वसुली केली जाणार आहे.

सिडको क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी खुल्या प्लॉटची नोंदणी स्वत:च्या नावावर करुन घेतल्यानंतर अनेक भूखंडधारकांनी महापालिकेचा मालमत्ता कर भरण्याकडे दुर्लक्ष केले. सिडकोतील असे 125 खुले भूखंड असलेल्या मालमत्ताधारकांची जागा ही मोकळी जागा असून त्यांच्याकडे 31 मार्च 2013 अखेर एकूण 24 लाख 70 हजार 828 रुपयांचा मालमत्ता कर थकित आहे.

या 125 भूखंडाच्या जागेत मालमत्तेचे मालक किंवा त्यांचा प्रतिनिधी यापैकी कोणीही राहत नाहीत. त्यांच्या पत्त्याची चौकशी केली असता पत्ताही मिळू शकला नाही. अशा स्थितीत महापालिकेने जाहीर सूचनेद्वारे सर्व थकबाकीदारांना त्यांच्याकडील मालमत्ता कर भरण्याची अंतीम सूचना देण्याचे आयुक्त जी. श्रीकांत व उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सूचित केले होते. त्यानुसार 125 भूखंडधारकांना जाहीर नोटीस बजावण्यात आली आहे. 15 दिवसात संबधितांनी महापालिकेच्या कार्यालयात येऊन त्यांच्याकडील संपूर्ण कराचा भरणा केला नाही तर त्यांच्या खुल्या भूखंडाची जप्ती करुन जाहीर लिलाव करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांनी दिली.

भूखंडधारकांची यादी येथे उपलब्ध
नोटीसा बजावण्यात आलेल्या भूखंडधारकाचे नाव, कर थकलेल्या मालमत्तेचा क्रमांक व त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम असा सर्व तपशील नांदेड महापालिकेच्या www.nwcmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संबधितांनी खुल्या भूखंडावरील मालमत्ताकर तातडीने भरावा, सदरचा भूखंड अन्य कोणी खरेदी केलेल असेल तर संबधितांनी नाव परिवर्तनाचा अर्ज दाखल करुन मालमत्ता कराची रक्कम सर्वप्रथम भरावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांनी केले आहे.

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.