nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :28-Dec-2012
नळाला तोट्या नसतील तर पाणीपुरवठा बंद करणार महापालिकेचा इशारा 

नांदेड, दि. 28: महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचा लाभ घेणार्‍या नागरिकांनी आपल्याकडील नळाला तोट्या बसवून आवश्यक तितक्याच पाण्याचा वापर करणे आवश्यक असून पाण्याचा अपव्यय केल्याचे निदर्शनास आले तर संबधितांचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील विशेषत: नांदेड शेजारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची भयानक स्थिती असताना शंकरसागर-विष्णुपुरी जलाशयात जेमतेम पाणी उपलब्ध असल्याने नांदेडची जनता सुदैवी आहे. प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाकडून केली जात असून नांदेडकरांनी पाण्याचा जपून वापर करावा.

पाण्याचा गैरवापर होत असल्याचे दिसल्यानंतर नागरिकांनी महापालिकेच्या संबधित क्षेत्रीय कार्यालय, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, उपायुक्त व आयुक्त यांच्यापैकी एकाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाण्याचा गैरवापर टाळण्याचे महापौर, उपमहापौरांचे आवाहन
महापालिकेतर्फे पुरवल्या जाणार्‍या पाण्याचा वापर सर्वप्रथम पिण्यासाठी आणि त्यानंतर घरगुती कारणासाठी करण्याला प्राधान्य द्यावा. परंतु वाहने/गुरे धुणे, घरासमोर सडा टाकणे, बांधकामांसाठी पाणी वापरणे अशा स्वरुपाच्या तसेच अन्य बाबीसाठी पाण्याचा वापर होणार नाही ज्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरेल याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत, सभागृह नेते स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, आयुक्त जी. श्रीकांत, उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी केले आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.