नांदेड, दि.28: महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केल्या जाणार्या जलवाहिनीतून अनधिकृतपणे ज़ोडणी घेतलेल्या नागरिकांनी आपली जोडणी शुल्क भरुन तातडीने अधिकृत करुन घ्यावी, तसेच निवासी वापर करण्य़ासाठी घेतलेल्या पाणीपुरवठा जोडणीचा अनिवासी/व्यावसायीक वापर होत असल्यास संबधितांनी तातडीने आपली नळजोडणीच्या परवान्याचे रुपांतर व्यावसायीक वापरात करुन वाढीव शुल्क भरावे, अन्यथा संबधितांविरुध्द गुन्हे नोंदवण्यात येतील, असा इशारा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
अशा स्वरुपाचा वापर करणार्यांबद्दलची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे, कार्यकारी अभियंता एस. डी. जाधव, उपअभियंता दिलीप आरसुळे यांच्याशी संपर्क साधावा अथवा थेट आयुक्त कक्षाकडे तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.