![]() | ||
| ||
समाचार |
|
Dated :24-Dec-2012 |
|
महिला, शिक्षण व बालकल्याण समितीच्या 11 सदस्यांची निवड | |
नांदेड, दि. 24: महापालिकेच्या पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी आज सोमवारी (दि.24) झालेल्या सर्वसाधारण सभेत 11 महिला सदस्यांची निवड करण्यात आली. विविध पक्षाच्या सभागृहातील प्रमुखांनी आपापल्या पक्षांना मिळणार्या सदस्यपदासाठी सदस्यांची नावे सुचवली. त्यानुसार कॉंग्रेसच्या सहा, शिवसेना व एमआयएमच्या प्रत्येकी दोन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका सदस्याची निवड करण्यात आली. कॉग्रेसकडून सौ. अनुजा अमितसिंह तेहरा, सौ. अन्नपूर्णा जम्मुसिंह ठाकूर, सोनाबाई रामचंद्र मोकले, स्नेहा सुधाकर पांढरे, गंगाबाई नारायणराव कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉ. शीला सुनील कदम, शिवसेनेच्या सौ. संगीता पृथ्वीराज राहोत्रे, सौ. वैशाली मिलींद देशमुख, एमआयएमच्या अंजूम बेगम शेख अफरोज, आसिया बेगम हबीब बागवान यांची निवड करण्यात आली. सर्व नव्या समिती सदस्यांचे महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, विरोधी पक्षनेते दिपकसिंघ रावत, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, मनपा आयुक्त जी .श्रीकांत, अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, गटनेते सय्यद शेरअली यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
==================================================================== |
|