nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
प्रगटन – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड च्या सर्व सेवानिवृत्त /कुटुंब निवृत्त वेतनधारक यांनी हयात रजिष्टरवर सही केलेले नाही अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी दि. 31.05.2022 पर्यंत मनपा मुख्य ईमारततील लेखा विभाग खोली क्रं. 311 मध्ये येवून हयात रजिष्टरवर सही करणेसाठी अवगत करावे. || मनपा नांदेड, साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदला बाबत ||  
समाचार

Dated :24-Dec-2012
मनपा स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड  


नांदेड, दि.24: महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी 16 नगरसेवकांची आज सोमवारी (दि.24) झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. यामध्ये सात महिला सदस्यांचा समावेश आहे.

महापालिकेतील पक्षीय बलाबलानुसार स्थायी सभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी विरोधी पक्षनेते दिपकसिंघ रावत यांनी शिवसेनेच्या तर सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी कॉग्रेसच्या सदस्यांची; त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या गटनेत्या डॉ. शीला सुनील कदम आणि एमआयएमचे गटनेते सय्यद शेरअली यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यांची यादी महापौर अब्दुल सत्तार यांच्याकडे सुपूर्द केली.

त्यानुसार कॉंग्रेसकडून स. सरजीतसिंघ गील, सतिश राखेवार, गणपत धबाले, फारुखअली खॉंन, अब्दुल लतिफ, सौ. मोहिनी कनकदंडे, कमलबाई मुदीराज, तहेसीन बेगम, शिवसेनेकडून स. गुरमितसिंघ नबाब, अशोक उमरेकर, सौ. शांता मुंडे, एमआयएमकडून लतिफा बेगम, चांदपाशा कुरेशी, अंजली गायकवाड, राष्ट्रवादीकडून गफार खॉन आणि सौ. श्रध्दा चव्हाण यांना स्थायी समितीवर पाठवण्यात आले आहे. या निवडीबद्दल महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, आयुक्त जी. श्रीकांत, अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.