nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :23-Dec-2012
पोलिस अधिक्षक संघ विजेता तर महापालिका उपविजेता 

नांदेड आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धा

नांदेड, दि. 23: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या संघाने महापालिकेच्या संघावर मात करुन विजेतेपद पटकावले तर महापालिकेच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संपूर्ण मालिकेत सर्वाधिक 128 धावा आणि 5 गडी बाद केल्यामुळे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांना मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गेल्या 7 ते 9 डिसेंबर दरम्यान नांदेडमधील विविध विभागाच्या कार्यालयांच्या संघामध्ये सामने खेळवल्यानंतर पोलिस अधिक्षक आणि महापालिकेचा संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. या दोन्ही संघादरम्यान शनिवारी (दि.22) अंतिम सामना झाला. पोलिस अधिक्षक संघाने क्षेत्ररक्षण, गोलंदाजी व फलंदाजी या तिन्ही कौशल्याच्या कसोटीवर महापालिकेच्या संघावर मात करीत एनडीएलचे (नांदेड डिपार्टमेंटल लीग) विजेतेपद पटकावले. पोलिस अधिक्षक संघाचे कर्णधार फौजदार वाघमोडे यांना मान्यवरांच्या हस्ते विजेदेपदाचा कप प्रदान करण्यात आला. पोलिस अधिक्षक संघाचे कडू व माधव यमेवार यांना अनुक्रमे सामनावीर व उत्त्कृष्ट यष्टीरक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. अंतिम सामन्यात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना मेडल देण्यात आले.

उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते या अंतिम सामन्याचे उदघाटन झाले. त्यानंतर त्यांनी काही काळ सामन्याचा आस्वाद घेऊन महापालिकेच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. पोलिस अधिक्षक व्ही. एन. जाधव,. अप्पर पोलिस अधिक्षक तानाजी चिखले, पोलिस उपअधिक्षक निलेश मोरे, आयुक्त जी. श्रीकांत यांचे वडील नरसप्पा सज्जन, पोलिस निरिक्षक श्रीधर पवार, सी. जी. यशवंत, देशमुख, महापालिकेतील विविध अधिकारी, सामन्याचे प्रायोजक एमएफ होंडाचे प्रतिनिधी यांची याप्रसंगी उपस्थिती होती. बक्षीस वितरण झाल्यानंतर दोन्ही संघाच्या वतीने जल्लोष करुन स्पर्धेची सांगता झाली. या जल्लोषात पोलिस अधिक्षक, मनपा आयुक्त, अप्पर पोलिस अधिक्षक तसेच त्यांचे सहकारी व खेळाडूही सहभागी झाले होते.

आयुक्तांना बाद करण्यासाठी पोलिस अधिक्षकांचे बक्षीस
मनपा संघाचे कर्णधार व आयुक्त जी. श्रीकांत हे धावपट्टीवर बराच काळ चांगली फलंदाजी करित असताना पोलिस अधिक्षक व्ही. एन. जाधव यांनी मनपा आयुक्तांना बाद करणार्‍या खेळाडूस रोख बक्षीस जाहीर केले. त्यामुळे सामन्यात चांगली रंगत आली होती.

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.