nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :23-Dec-2012
नांदेडमधील पर्यटन प्रकल्पात गुंतवणुकीसाठी अनिवासी शीख भारतीय उत्सुक- पालकमंत्री सावंत 

नांदेड, दि. 23: शीख समुदायातील अनिवासी भारतीयांनी नांदेडमध्ये गुंतवणूक करुन गुरुघराची सेवा आणि दातृत्वाचे काम करण्याची तयारी दाखवली आहे. त्याकरिता पर्यटनाच्या बीओटी प्रकल्पाबाबत महापालिकेने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना प्रोत्साहित करावे. महापालिकेचे अनेक प्रकल्प त्यांच्यामुळे साकार होतील आणि महापालिकेला स्वत:ची गुंतवणूक करण्याचीही गरज पडणार नाही, असा प्रस्ताव पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी महापालिकेला शनिवारी घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान ठेवला.

नांदेडला नुकतेच काही अनिवासी भारतीय असलेले शिख बांधव येऊन गेले. महापालिका व लॉयन्स क्लबच्या संयुक्तरित्या चालवण्यात येणारे नेत्र रुग्णालय पाहून त्यांनी महापालिकेचे शिवाजीनगर किंवा इतर ठिकाणी एक रुग्णालय चालविण्याची तयारी दर्शवली आहे. भविष्यात असा प्रकल्प त्यांना ना नफा न तोटा किंवा रुग्णांवर मोफत उपचारासाठी चालवायला त्यांना देण्यास हरकत नाही. महापालिकेने स्वत:ची गुंतवणूक करुन खर्च वाढवण्यापेक्षा पर्यतनाचे प्रकल्प बीओटी तत्वावर विकसीत करण्यावर भर द्यावा आणि दैनंदिन अत्यावश्यक गरजेसाठी स्वत:चा निधी वापरावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.

खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी गायत्री मंदीर परिसराच्या सुशोभिकरणाचे काम बर्यावच दिवसांपासून प्रलंबीत असून महापालिकेने ते तात्काळ सुरु करावे, अशी सूचना केली. तर आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी जुना पुल ते गोवर्धनघाट पुलाला जोडणा-या कौठा येथील रविनगर रस्त्याचे काम तात्काळ हाती घेण्याचा आग्रह लावून धरला. सदर दोन्ही कामे तात्काळ सुरु करण्याची सूचना अशोकराव चव्हाण यांनी केली.

आमदार अमर राजूरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिकेचे पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ नेऊन नांदेड महापालिकेसाठी विशेष अनुदानवजा निधी देण्याचा आग्रह करण्याचे मत व्यक्त केले.

महापौर अब्दुल सत्तार यांनी महापालिकेकडे पैसा नसल्याने शहरातील नगरोत्थान अभियानाची कामे बंद असून शासनानेही त्यांच्या निधीचा वाटा वितरित केला नसल्याचे निदर्शनास आणले. महापालिकेत अधिकार्यांाची कमतरता असल्याच्या बाबीकडेही त्यांनी लक्ष वेधले. या प्रश्नासंबधी पालकमंत्र्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे श्री. चव्हाण यांनी सुचवले.

उपमहापौर आनंद चव्हाण यांनी महापालिकेच्या आर्थिक बाबीवर देखरेख करुन खर्च कमी करणे व उत्पन्न वाढवण्यासाठी वाणिज्य सल्लागाराच्या नेमणुकीची प्रक्रिया लवकर सुरु करण्याची मागणी केली. शासनातील वरिष्ठ सनदी अधिकार्यां्शी चर्चा करुन हा प्रश्न तात्काळ हाताळण्याची सूचना अशोकराव चव्हाण यांनी मनपा आयुक्तांना केली.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.