nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :23-Dec-2012
नांदेड महापालिकेसाठी शासनाकडे विशेष अनुदान मागावे- माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण 

 मोक़ळ्या जागांचा बीओटी तत्वावर विकास करावा
 मनपा हद्दवाढीसाठी हिरवा कंदील
 विमानतळ रस्त्याच्या शिवमंदिरकडील बाजूने वॉक वे उभारण्याची सूचना

नांदेड, दि. 23: केवळ महसूली उत्पन्नातून महापालिका क्षेत्रातील प्रस्तावीत विकासकामे पूर्ण होऊ शकणार नाहीत. औरंगाबाद महापालिकेला नुकत्याच दिलेल्या 50 कोटीप्रमाणे नांदेड महापालिकेला पुढच्या पाच वर्षात दरवर्षी प्रत्येकी 25 कोटी अनुदान देण्याची मागणी शासनाकडे करावी, अशी सूचना माजी मुख्यमंत्री व आमदार अशोकराव चव्हाण यांनी शनिवारी (दि.22) घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान महापालिका प्रशासनाला केली.

नांदेड शहरातील विविध विकासकामासंदर्भात सह्याद्री शासकीय विश्रामगृहावर आयोजित बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री ना. डी. पी. सावंत बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी खा. भास्करराव पाटील खतगावकर, आ. ओमप्रकाश पोकर्णा, आ. अमर राजूरकर, महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, आयुक्त जी. श्रीकांत, अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा शल्य चिकित्सक राठोड, एमआयडीसीचे अधिकारी संतोष पाटील, कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्याम दरक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महापालिकेच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.

विमानतळ ते शिवमंदिर रस्त्यावर डाव्या बाजूने वाढलेली झुडुपे काढून मुंबईतील नरिमन पॉईंटप्रमाणे नागरिकांना फिरण्यासाठी ‘वॉक वे’ ची उभारणी करावी, विमानतळ प्राधिकरणासोबत चर्चा करुन या रस्त्यावरील पथदिव्यांची रचना बदलून नव्याने उभारणी करावी तसेच येथे बसवलेले पूर्वीचे पथदिवे जुना मोंढा ते ट्रेझर बजार रस्त्यावर लावावेत. सिडको क्रीडा संकुलाचे शिल्लक काम मार्चअखेरपर्यंत सुरु करावे, अशी सूचना चव्हाण यांनी केली. केंद्रीय सांस्कृतीक कार्य मंत्री चिरंजीवी यांना नांदेडला बोलावून बंदाघाट येथील गोदावरी नदीवर सौदर्यीकरण, नंदगिरी किल्ला विकास व अन्य पर्यटनविषयक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांच्याकडून केंद्राचा विशेष निधी मागण्याचा मानस यावेळी अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.

महापालिकेने आवश्यकतेनुसार हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंज़ुरीसाठी पाठवावा. विविध महापुरुषांच्या पुतळ्याच्या कामांना गती देण्यासाठी स्वतंत्र अधिका-यामार्फत पाठपुरावा करुन कामे मार्गी लावावी. ऑनलाईन कर भरण्याची सुविधा सुरु करावी. कत्तलखाना स्थलांतरीत करण्याच्या विषयासंबधी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक खासदार, आमदार, महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन तो प्रश्न निकाली काढावा. शासकीय रुग्णालयात पाच डायलिसीस क्षमतेचे सेंटर तात्काळ सुरु करण्यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे, असे अशोकराव चव्हाण यांनी सुचवले. तुप्पा येथील घनकचरा प्रकल्पाचे काम मार्चअखेर पूर्ण करुन दि. 1 एप्रीलपासून तेथे कचरा टाकण्याचे तर 30 एप्रीलपासून कचर्यापपासून उपपदार्थ तयार करण्याचे काम सुरु होईल, अशी हमी मनपाच्या घनकचरा ठेकेदाराचे प्रतिनिधी पांडे यांनी दिली.

मोकळ्या जागांचा बीओटी तत्वावर विकास करा
तरोडा नाका, इतवारा, सिडको, खोब्रागडेनगर यासह काही नवी ठिकाणे शोधून तेथे बीओटी तत्वावर भाजीमार्केट विकसीत करा. महापालिकेच्या मोक़ळ्या जागा शोधून त्यातील काही ठिकाणी बीओटी प्रकल्पाचे काम सुरु करावे. महापालिकेने मोकळ्या जागांचा विकास करण्यासाठी स्वत:चा निधी वापरण्याऐवजी लोकांना त्या विकसीत करण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी. त्याकरिता वृत्तपत्रातून जाहिरात द्यावी. मुंबईत एमएमआरडीएने मोकळ्या जागांची जाहीर लिलावाद्वारे विक्री करुन त्याचा पैसा विकासकामासाठी वापरण्याचे कौशल्य विकसीत केले आहे. यातून मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध होऊन विनावापर असलेल्या भूखंडाचा वापरही सुरु होतो. त्या धर्तीवर नांदेडला असे काही करता येते का, याची चाचपणी करावी, अशी सूचनाही श्री. चव्हाण यांनी केली.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.