nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :20-Dec-2012
रेल्वे स्टेशन परिसरात आज ‘ट्रॉफिक डे’ 


• शालेय विद्यार्थी आणि प्रशासनाचा संयुक्त उपक्रम
• सात पथकातील दोनशे जण रस्त्यावर उतरणार

नांदेड, दि.20: रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी या परिसरात शुक्रवारी (दि.21) सकाळी 10 ते 11 या वेळेत शालेय विद्यार्थी व प्रशासनाच्या वतीने ‘ट्रॉफिक डे’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत वेगवेगळ्या सात पथकातील जवळपास 200 जणांकडून वाहतुकीचे नियंत्रण केले जाणार आहे.

या उपक्रमात आंध्र समिती तेलगू हायस्कूलचे 50 विद्यार्थी आणि जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या 50 विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत. प्रशासनाच्या वतीने प्रादेशीक परिवहन अधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक आणि त्यांचे काही कर्मचारी, रेल्वे सुरक्षा पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती महापालिकेचे अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी यांनी दिली.

मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या पुढाकारामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शाळांच्या सूचनेप्रमाणे त्यांचे राष्ट्रीय छात्रसेनेचे (एन.सी.सी) विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. उपक्रमात सहभागी होणा-या विद्यार्थ्यांना शहर वाहतूक शाखेकडून वाहतुक नियमावलीचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत असल्याने अनेक शाळा उपक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचे मनपाचे परिवहन अधिकारी राजकुमार वानखेडे यांनी सांगितले. महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांना या उपक्रमाचे निमंत्रण देण्यात आल्याचे वानखेडे यांनी सांगितले.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.