nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :19-Dec-2012
महापालिका व पोलिस अधिक्षक संघामध्ये शनिवारी अंतिम सामना 


मनपा आंतर कार्यालयीन क्रिकेट स्‍पर्धा
नांदेड दि.19: महानगरपालिकेच्‍या वतीने आयोजित आंतर कार्यालयीन क्रिकेट स्‍पर्धेचा अंतिम सामना रविवारऐवजी आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि.22) होणार आहे. महानगरपालिका आणि पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या संघात श्री गुरुगोविंदसिंघजी स्‍टेडीयमवर सकाळी दहा वाजता सामन्याला प्रारंभ होणार आहे.

दि. 7 ते 9 डिसेंबर या दरम्‍यान शहरातील विविध शासकीय कार्यालये व क्रिडा शिक्षक यांचे क्रिकेट सामने झाले. उपांत्‍य फेरीत महानगरपालिकने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संघाला तर पोलिस अधिक्षक कार्यालयाने कै. शंकरराव चव्‍हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या संघाला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता. विजेतेपदाच्या सामन्यासाठी पात्र ठरलेल्या दोन्ही संघामधील अंतिम सामना याआधी रविवारी (दि.23) घेण्याचे जाहीर करण्यात करण्यात आले होते. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव हा सामना आदल्या दिवशी, शनिवारी (दि.22 डिसेंबर) खेळवण्यात येणार आहे.

अंतिम सामना पाहण्यासाठी महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, विरोधी पक्षनेते दिपकसिंघ रावत, सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांच्यासह नगरसेवक/नगरसेविका यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नांदेडमधील क्रिकेटप्रेमी आणि नागरिकांनी हा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवाजी डहाळे आणि स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे यांनी केले आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.