nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :18-Dec-2012
अल्पसंख्याक आयोगाला न्यायालयाचा दर्जा देण्याची गरज- प्रा. हाश्मी 


नांदेड, दि.18: अल्पसंख्याक हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राजस्थानप्रमाणे अल्पसंख्याक आयोगाला न्यायालयाचा दर्जा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. मुबारक हबीब हाश्मी यांनी मंगळवारी (दि.18) महापालिकेतील अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आयोजीत व्याख्यानात केले.

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त महापालिका प्रशासकीय इमारतीतील प्रशिक्षण हॉलमध्ये आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. महापौर अब्दुल सत्तार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी उपमहापौर आनंद चव्हाण, अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, गटनेते सय्यद शेरअली, नगरसेवक किशोर यादव, हबीब बागवान, नगरसेविका डॉ. करुणा जमदाडे, कार्यकारी अभियंता कलीम परवेज यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना महापौर अब्दुल सत्तार म्हणाले की, अल्पसंख्याकाच्या हक्कासाठी अनेक योजना आहेत, परंतु अंमलबजावणी करताना काही ठिकाणी कायदेशीर अडचणी निर्माण होतात. त्याची छाननी करुन दूर करण्यासाठी शासनस्तरावर आपला पाठपुरावा राहील. नगरसेवकांनी आपल्या भागातील शाळाबाह्य अल्पसंख्याक मुले शोधून त्यांना शाळेत पाठवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.उपमहापौर आनंद चव्हाण, शेरअली, किशोर यादव, डॉ. करुणा जमदाडे, कलीम परवेज यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास महापालिकेतील अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचार्‍य़ांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

उर्दु घराचे लवकरच भूमिपूजन
केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री रहेमान खान यांची नवी दिल्ली दौ-याच्या वेळी आपण भेट घेतली असून लवकरच त्यांच्यासह राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांच्या उपस्थितीत नांदेडात उर्दु घराचे भूमिपूजन कार्यक्रम ठेवण्याचा आपला मानस आहे, असे महापौरांनी सांगितले.

20 शाळाबाह्य अल्पसंख्याक मुले
सहा कर्मचा-य़ांनी घेतली दत्तक
महापालिका क्षेत्रातील 20 शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सामील करुन घेण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागातील सहा कर्मचार्‍यांनी दत्तक घेण्याचा आगळावेगळा संकल्प आजच्या दिनानिमित्त केला. या 20 मुलांना यावेळी महापालिकेच्या वतीने महापौरांसह इतर मान्यवरांच्या हस्ते मोफत गणवेश तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. उपमहापौर आनंद चव्हाण यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षणाधिकारी भागवत जोशी यांनी सूत्रसंचलन केले. सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांनी आभार मानले.

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.