nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :18-Dec-2012
ब्रम्हपुरीतील बीएसयुपी घरकुलांच्या बांधकामास महापौरांच्या हस्ते प्रारंभ 


नांदेड, दि.18: ब्रम्हपुरीतील 94.32 कोटी रुपयांच्या बीएसयुपी प्रकल्पातंर्गत घरकुल पायाभरणीच्या कामास महापौर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मंगळवारी (दि.18) प्रारंभ करण्यात आला.

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ब्रम्हपुरी भागातील घरकुल आणि इतर पायाभूत सुविधेसाठी 94.32 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पालकमंत्री ना. डी. पी. सावंत यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले होते. मध्यंतरी महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरु करता आले नव्हते. महापौर-उपमहापौर यांच्या निवडीनंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी महापालिकेच्या पदाधिकारी व अधिका-यांच्या बैठकीत ब्रम्हपुरीतील घरकुलांचे काम लवकर सुरु करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महापौर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मंगळवारी या भागातील घरकुलांच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी एमआयएमचे गटनेते सय्यद शेरअली, नगरसेवक नवल पोकर्णा, नगरसेवक हबीब बागवान, कार्यकारी अभियंता कलीम परवेज, स. फसिओद्दीन, अब्दुल गफार यांची प्रमुख उपस्थिती होती. ब्रम्हपुरीतील घरकुलाचे काम दर्जेदार करुन वेळेत पूर्ण करावे, अशी सूचना महापौर सत्तार यांनी याप्रसंगी ठेकेदारास केली.

बांधकामास प्रारंभ करण्यापूर्वीच ब्रम्हपुरीतील 30 लाभार्थ्यांनी लोकवाटा भरला. यातील 10 लाभार्थ्यांच्या घरकुलाचे रेखांकन (मार्कआऊट) देण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते 4 घरकुलाच्या पायाभरणीचा कार्यक्रम यावेळी झाला.

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.