nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :17-Dec-2012
लोकशाही दिनातच होणार तक्रारीचा निपटारा 

15 दिवस आधी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक

नांदेड, दि.17: राज्य शासनाने विविध स्तरांवर होणार्‍य़ा लोकशाही दिन कार्यक्रमाच्या स्वरुपात बदल केला असून नागरिकांच्या तक्रारीची सोडवणूक प्राधान्याने करण्यासाठी लोकशाही दिन संबंधातील तक्रारीचे अर्ज आता 15 दिवस आधी दोन प्रतीत देणे आवश्यक केले आहे. या प्रक्रियेमुळे अर्जदाराच्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली, याची माहिती लोकशाही दिनाच्या कार्यक्रमातच नागरिकांना मिळणे शक्य होणार आहे. या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.

महानगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावरील स्थायी समिती सभागृह, कक्ष क्र. 119 येथे पूर्वीप्रमाणेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी दहा वाजता लोकशाही दिन होणार असून या दिवशी सुट्टी आल्यास त्यानंतर येणारा कामकाजाच्या दिवशी लोकशाही दिन घेतला जाणार आहे. महापालिकेच्या लोकशाही दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वत: मनपा आयुक्त हे राहणार असून जिल्हाधिकारी यांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी अथवा निवासी उपजिल्हाधिकारी, वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच महानगरपालिकेच्या विभागांचे प्रमुख हजर राहतील.

तक्रार वैयक्तिक स्वरुपाचीच हवी
लोकशाही दिनात दाखल होणार्‍या तक्रारीचे स्वरुप निश्चित करण्यात आले असून तक्रार/ निवेदन हे व्यक्तिगत स्वरुपाचे असणे आवश्यक आहे. न्यायप्रविष्ठ, राजस्व/अपील, सेवाविषयक/आस्थापनाविषयक बाबी नमूद केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. ज्यात अंतीम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे, अशा विषयासंदर्भात पुन्हा अर्ज स्विकारले जाणार नाहीत. त्याचबरोबर व्यक्तीगत स्वरुपाची नसलेली तक्रार किंवा विहित नमुन्यात अर्ज नसतील आणि त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती जोडल्या नसतील तर संबधीत अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
लोकशाही दिनासाठी अर्ज स्वीकृत केल्यानंतर संबधीत विभागप्रमुखांमार्फत लोकशाही दिनी संबधीत अर्जावर केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात येईल. असा अहवाल, अर्जदाराची विनंती, त्याबद्दलचे नियम, शासनाची भूमिका, तरतूदी या बाबींचा विचार करुन आयुक्त हे अर्जावर योग्य निर्णय देतील.

अर्ज येथे उपलब्ध
अर्जाचा विहित नमुना महापालिकेच्या www.nwcmc.gov.in या संकेतस्थळावर तसेच महापालिकेच्या जनसंपर्क विभागात (कक्ष क्र..117, पहिला मजला) उपलब्ध असून अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जदारास विहित नमुन्यात पोचपावतीही देण्यात येणार आहे. जे अर्ज लोकशाही दिनात स्वीकृत करता येणार नाहीत, असे अर्ज संबधीत विभागाकडे आवश्यक त्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात येतील व त्याची प्रत अर्जदारास देण्यात येईल.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.