nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
सन्माननीय सदस्य व स्विकृत सदस्य यादी ||  
समाचार

Dated :16-Dec-2012
पाच शहराच्या प्रतिनिधी मंडळाने महापालिकेस दिली भेट  

अल्प कालावधीत झालेला नांदेडचा विकास प्रेरणादायी

नांदेड, दि.16: गुर-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने नांदेड शहराला मिळालेल्या निधीचा केवळ योग्य विनियोगच नव्हे तर अतिशय अल्प कालावधीत पूर्ण केलेली कामे देशातील इतर शहरासाठी प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास उत्तर भारतातील विविध राज्यातील पाच शहरातून येथे दाखल झालेल्या प्रतिनिधी मंडळाने व्यक्त केला.

केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम अंतर्गत नांदेड शहरात झालेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी अजमेर, चंडीगढ, लुधियाना, फरिदाबाद व अमृतसर या पाच शहरातील महापालिकेचे महापौर आणि आयुक्त हे दि.15 व 16 डिसेंबर रोजी नांदेड दौ-यावर येणार होते. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नाही. त्यांनी आपल्या प्रतिनिधी मंडळास पाठवून नांदेडच्या विकासाची माहिती घेतली. या प्रतिनिधी मंडळात वैज्ञानिक श्रीमती निरंजना दासगुप्ता, अमृतसर पालिकेचे मुख्य अभियंता ए. एस. ढालीवाल, अतिरिक्त आयुक्त एच. एस. खोसा, फरिदाबादचे कार्यकारी अभियंता एस. के. अग्रवाल व अनिल मेहता, लुधियानाचे राहूल गगणेजा, चंडीगढचे कार्यकारी अभियंता फरिंदरसिंघ आदींचा समावेश होता.

प्रतिनिधी मंडळाने शनिवारी शहरातील विविध विकासकामांची पाहणी केल्यानंतर रात्री गोविंदबाग येथील जगप्रसिध्द ‘लेझर शो’चा आस्वाद घेतला. रविवारी सकाळी त्यांनी गुरुद्वारा येथे जावून दर्शन घेतले. त्यानंतर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीला भेट देऊन महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, आयुक्त जी. श्रीकांत, अपर आयुक्त रा. ल. गगराणी, उपयुक्त रत्नाकर वाघमारे यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान नांदेडच्या विकासकामात विशेषत: रुंदीकरणात आलेल्या अडचणींचे टप्पे व त्यावर केलेली मात याविषयींची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. याप्रसंगी महापौर, उपमहापौर, सभागृह नेते व अधिकार्‍यांच्या वतीने प्रतिनिधी मंडळातील सदस्यांचा शाल, श्रीफळ आणि सचखंड गुरुद्वाराची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

बीएसयुपी योजनेतील लाभार्थ्यांचे तात्पुरते स्थलांतर करुन त्यांना त्याच ठिकाणी घरकुल बांधून देण्याचे अवघड काम अवर्णनीय असल्याचा उल्लेख पाहुण्यांनी याप्रसंगी केला. बीओटी तत्वावर उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाची प्रशासकीय पध्दत, लेखा विभागातील दुबार नोंदीच्या यंत्रणेची त्यांनी माहिती घेतली. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत ‘जितका कचरा, तितके दाम’ या सूत्राच्या अंमलबजावणीच्या पध्दतीचेही त्यांनी कौतुक केले. दोन दिवसांचा दौरा आटोपून प्रतिनिधी मंडळ आपापल्या शहराकडे रवाना झाले आहे.

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.