nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :13-Dec-2012
आधार नोंदणीचा दुसरा टप्पा सुरु 


नांदेड, दि.12: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीत गुरुवारपासून (दि.13) आधार नोंदणीच्या दुसर्‍या टप्प्यास प्रारंभ होणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अपर आयुक्त तथा नोडल ऑफिसर रा. ल. गगराणी यांनी दिली.

शासनाने आधार नोंदणीच्या दुसर्‍या टप्प्यास नुकताच सुरु केला आहे. त्यानुसार मनपा क्षेत्रात सध्यस्थितीत चार क्षेत्रिय कार्यालयातर्गत प्रमुख ठिकाणी आधार नोंदणी सुरु करण्यात येणार असून त्यात वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.1) लेबर कॉलनी मनपा शाळा,2) श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम येथील अशोकनगर क्षेत्रीय कार्यालय,3) गाडीपुरा येथील गांधी राष्ट्रीय विद्यालय आणि 4) तरोडा (खु.) तसेच मूळ गाव येथील जि. प. शाळा अशा चार ठिकाणी गुरुवारपासून आधार नोंदणीच्या दुसर्‍या टप्प्यास प्रारंभ होणार आहे. या चारही केंद्राच्या संचालनाचे काम अलं‍कित फीनसेन म. मुंबई यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

रहिवासी आणि फोटो पुरावा आवश्यक

आधार नोंदणीची पध्दत आता सुलभ झाली असून नागरिकांनी भरावयाच्या अर्जाचा नमुना सुटसुटीत करण्यात आला आहे. नागरिकांनी अर्जासोबत आपल्या फोटो पुरावा आणि रहिवासी पुरावा असलेल्या सर्व कागदपत्रांची एक झेरॉक्स प्रत सोबत आणून नोंदणी केंद्रावर जमा करावी तसेच मूळ पुरावे तपासणीसाठी सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दुबार नोंदणी केल्यास कारवाई

ज्यांनी यापूर्वी आधार नोंदणी केली नाही अशाच लोकांनी नोंदणीसाठी केंद्रावर संपर्क करावा. केवळ नवीन नोंदणी करण्यासाठीच ही सुविधा उपलब्ध आहे. यापूर्वी नोंदणी झालेल्या नागरिकांची पुन्हा नोंदणी होणार नाही त्‍यांनी नोंदणी केंद्रा‍कडे जाऊ नये तसेच त्‍यांचे आधार ओळखपत्र आले नसतील तरी देखील तेथे जाऊ नये फक्‍त नवीन ना्गर‍कांनीच यावे. असे न केल्‍यास संबधित नाग‍‍रि‍कांविरुध्‍द कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ज्यांना नोंदणीनंतर अद्याप आधार कार्ड प्राप्त झाले नाहीत, अशांनी ‘आधार’ नोंदणीच्या www.uidai.gov.in या संकेतस्थळावर जावून आपल्या नोंदणीची विद्यमान स्थिती तपासावी तसेच आवश्यकतेनुसार 1800-180-1947 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात अडीच
लाख नागरिकांची नोंदणी पूर्ण

यापूर्वी दि. 18 जानेवारी 2011 ते 15 फेब्रुवारी 2012 या कालावधीत मनपा क्षेत्रात 2 लाख 57 हजार 730 नागरिकांची आधार नोंदणी करुन 2011 च्या जनगणनेच्या अंदाजीत आकडेवारीच्या तुलनेत 46.02 टक्के नागरिकांची आधार नोंदणी पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्यात आली होती.
नांदेड जिल्‍हा व शहरात आधार नोंदणी जलद गतीने व्‍‍हावी.म्‍‍हणुन पोस्‍ट ऑफीस,बॅक ऑफ इंडीया,यूनीयन बॅक,देना बॅक, ओरीयंटल बॅक व इतरांना देखील आधार केंद्र चालु करणेसाठी सुचना दिल्‍या आहेत. जेने करुन नागरीकांची दैनंदिन कामे जेथे होतात त्‍या ठी‍काणी आधार कार्ड काढणे सुलभ होईल.तसेच शहरातील सेतु केंद्र,इतर बॅका नागरीबॅका,इतर शासकीय,निमशासकीय कार्यालये खाजगी संस्‍था यांना देखील आधार केंद्र सुरु करता येइल त्‍यासाठी त्‍यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालय किंवा / महानगरपालि‍का कार्यालयात संपर्क साधावा असेही अवाहन करण्‍यात येत आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.