nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :14-Dec-2012
‘जेएनएनयुआरएम’च्या पाहणीसाठी पाच शहरांचे महापौर व आयुक्त आज व उद्या नांदेडमध्ये 


नांदेड, दि. 14 : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रात जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थानअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी उत्तर भारतातील पाच प्रमुख शहरातील महापौर आणि आयुक्त दि. 15 व 16 डिसेंबर रोजी नांदेडच्या दौ-यावर येत आहेत.

या पथकामध्ये सहभागी असलेले महापौर व आयुक्तांची नावे अनुक्रमे अशी: अमृतसरचे (पंजाब) बक्षीराम अरोरा आणि धरमपाल गुप्ता, लुधियानाचे हरचरणसिंघ गोहलवारिया व राकेशकुमार वर्मा, अजमेरचे (राजस्थान) कमल बकोलिया व बजरंगसिंह चव्हाण, फरिदाबादचे (हरियाना) अशोक अरोरा व डॉ. डी. सुरेश, चंडीगढचे (पंजाब) श्रीमती राजबाला मल्लिक व विवेक प्रतापसिंह.

ही सर्व मंडळी मनपा क्षेत्रात जेएनएनयुआरएमअंतर्गत झालेली सर्व प्रकारच्या कामांची पाहणी करणार आहे. आपल्या दौ-यादरम्यान हे पथक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला भेट देणार असून सचखंड गुरुद्वारा येथे जाऊन दर्शनही घेणार आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.