nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :14-Dec-2012
सभागृह नेतेपदी गाडीवाले, विरोधी पक्षनेतेपदी रावत 



एमआयएमच्या गटनेतेपदी शेरअली तर
राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी डॉ. शीला कदम

नांदेड, दि. 14: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, तसेच सभागृहातील अन्य दोन प्रमुख पक्षांच्या गटनेत्यांची निवड महापौर अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी (दि.14) जाहीर केली आहे.
कॉग्रेसचे अँड. विरेंद्रसिंघ गाडीवाले यांची सभागृह नेतेपदी तर शिवसेनेचे दिपकसिंह रावत यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. एमआयएम-संविधान पक्ष आघाडीच्या गटनेतेपदी एमआयएमचे शेरअली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदी डॉ. शीला सुनील कदम यांची निवड करण्यात झाली आहे. या निवडीबद्दल महापौरांच्या कक्षात आज सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा महापौर अब्दुल सत्तार यांच्या वतीने सत्कार करुन त्यांच्या पुढील कार्यकाळास शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी अँड. विरेंद्रसिंघ गाडीवाले, दिपकसिंह रावत, शेरअली, डॉ. शीला सुनील कदम या नूतन पदाधिका-यांसह, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तसेच नगरसेवक दिलीप कंदकुर्ते, नवल पोकर्णा, किशोर यादव, माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला, माजी विरोधी पक्षनेते महेश उर्फ बाळू खोमणे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष सय्यद मोईन, पत्रकार गोवर्धन बियाणी, मुन्तजीबोद्दीन आदींची उपस्थिती होती.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.