nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :11-Dec-2012
महापालिका व पोलिस अधिक्षक संघात रविवारी चुरस 


मनपा आंतर कार्यालयीन क्रिकेट स्‍पर्धा

नांदेड दि.11: महानगरपालिकेच्‍या वतीने आयोजित आंतर कार्यालयीन क्रिकेट स्‍पर्धेत उपांत्‍य फेरित महानगरपालिकेच्‍या संघाने जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या संघाला नमवून तर पोलिस अधिक्षक कार्यालयाच्‍या संघाने वैद्यकिय महाविद्यालयाच्‍या संघाला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता येत्‍या रविवारी (दि. 23) श्री गुरुगोविंदसिंघजी स्‍टेडीयमवर या दोन्‍ही संघात अंतिम सामना होणार आहे.

दि. 7 ते 9 डिसेंबर या दरम्‍यान शहरातील विविध शासकीय कार्यालये व क्रिडा शिक्षक यांचे क्रिकेट सामने झाले. दि. 9 रोजी झालेल्या उपांत्‍य फेरीत प्रथम महानगरपालिका विरुध्‍द जिल्‍हाधिकारी कार्यालय असा सामना झाला. जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या संघाने नाणेफेक जिंकुन फलंदाजी स्‍विकारली. या संघाच्या अल्‍लमवार (26), बाबर (23), स्‍वप्निल (15) या खेळाडूंनी 159 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्‍युत्‍तरादाखल मनपाच्‍या संघाकडून कर्णधार व आयुक्‍त जी. श्रीकांत (45), विजय मोडके (53), सुमित दवणे (22) शिवाजी डहाळे (नाबाद 11), बालाजी लंकवाडे (नाबाद 7) यांनी 20 पैकी 18 षटकातच 160 धावा काढून जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या संघाने दिलेले आव्‍हान सहजपणे पेलत 6 गडी राखून विजय मिळविला.

पोलिस अधिक्षक कार्यालय विरुध्‍द शंकरराव चव्‍हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय यांच्‍यात झालेल्‍या दुस-या उपांत्‍य सामन्‍यात नाणेफेक जिंकुन पोलिस अधिक्षक कार्यालयाने प्रथम फलंदाजी स्‍वीकारली, या संघाने धावांचा वर्षाव करत तब्‍बल 178 धावा काढुन तीन दिवसीय क्रिकेट सामन्‍यात उच्‍चांक प्रस्‍थापित केला. या संघाच्‍या बंटी (34), वाघमोडे (26), सुमित (21), नंदलाल (नाबाद 19), श्रीकांत (19), नारायण (12) यांनी आपल्‍या संघाला भरघोस धावा मिळवून दिल्‍या. प्रत्‍युत्‍तरासाठी वैद्यकिय महाविद्यालयाचा संघ मैदानावर उतरला तेंव्‍हा अपेक्षेप्रमाणे तणावाखाली होता. या संघाला 13 व्‍या षटकात आपले सर्व गडी गमावून केवळ 94 धावसंख्‍येवर तंबुत परतावे लागले. त्‍यामुळे पोलिस अधिक्षक संघाने या सामन्‍यात 84 धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.